शहादा | प्रतिनिधी
म्हसावद,ता.शहादा येथील दोन शेतकर्यांनी लावलेली पपईचे रोपे नर प्रजातीची निघाल्याने पासष्ट हजाराचे नुकसान झाले असून चार ते पाच फुट वाढलेले पपईचे पीक रोटाव्हेटर मारून काढून टाकण्यात आले आहे.याबाबत म्हसावद पोलीसात तक्रार केली असून संबंधीत रोपे विक्री करणार्याचा मोबाईल नॉट रिचेबल येतोय.दरम्यान शिरपूर तालुक्यातही असाच प्रकार घडला असून लाखोचे नुकसान झाले आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की, एप्रिल महिन्यात म्हसावद येथील छोटूलाल लामगे, दौलत ठाकरे या शेतकर्यांनी बार्शी,ता.परांडा,जि.उस्मानाबाद येथील परमेश्वर हनूमंत बानगुडे यांनी जे-१५ प्रजातीची सहा हजार रोपे दिली.रोपे देतांना पपई पिक खरेदी करणे,चांगला भाव देणे असे आमिषही दाखवण्यात आले.सहा हजार रोपाचे बील निम्मे रोखीने तर बाकी ऑनलाईन देण्यात आले.दरम्यान एप्रिल महिन्यात लागवड केलेल्या पपई पिकास औषधी,खते,मजूरी व इतर खर्च केला.पपईची रोपे वाढ अगदी चांगली होवून चार ते पाच फुटापर्यंत वाढली मात्र त्यांना तुरे निघत असल्याने नव्वद टक्के रोपे नर प्रजातीची असल्याचे आढळून आले. संबंधीतांना शेतकरी यांनी शेतातील पिकाचे फोटो पाठवून संपर्क साधला असता ऊडवा ऊडवीची ऊत्तरे देण्यात आली.शेवटी हताश होवून शेतकर्यांनी रोटाव्हेटर मारून पपईचे पीक किढून टाकले.यामुळे दोन्ही शेतकरी मिळून दीड लाखाचे नुकसान झाले आहे.याबाबत म्हसावद पोलीसात तक्रार केली असून पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांनी दहा दिवसाची सवलत दिली आहे.शेतकर्यांची भेट घेवून झालेल्या नुकसानीबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार आहे.