Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रेरणादायी: वनमजुराचा मुलगा डॉ. अर्जुन पावरा बनणार उपजिल्हाधिकारी, एम.पी.एस.सी परीक्षेत राज्यात प्रथम

team by team
March 19, 2023
in राज्य
0
प्रेरणादायी: वनमजुराचा मुलगा डॉ. अर्जुन पावरा बनणार उपजिल्हाधिकारी, एम.पी.एस.सी परीक्षेत राज्यात प्रथम

नंदूरबार l प्रतिनिधी

ज्या गावाच्या नावातच पाणी आहे त्या गावातील लोकांनी स्वातंत्र्याची 7 दशके ओलांडल्यानंतर नळाला पाणी पाहिलं. रस्ता, वीज, शाळा, आरोग्य सेवा आदी सारख्या मूलभूत सेवा देखील ज्या गावात पोहोचण्यासाठी 70 वर्षे प्रतीक्षा करावी लागली. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात सातपुडा पर्वताच्या कुशीत वसलेलं अतिशय दुर्गम भागातील शेवटचं असणाऱ्या धजापाणी गावची ही व्यथा आहे. आता या गावातील एका वनमजुराच्या मुलाने राज्यसेवा परीक्षेत घवघवीत यश मिळवलं आहे. परिस्थितीवर मात करत डॉ. अर्जुन पावरा हे राज्यात अनुसूचित जमाती प्रवर्गातून पहिले आले आहेत.

डॉ. अर्जुन पावरा यांचं मुळ गाव सातपुड्याच्या कुशीतील धजापाणी हे आहे. गावात कोणत्याही सुविधा नाहीत. हे गाव मालदा ग्रामपंचायत अंतर्गत येते. अत्यंत दूर्गम भाग असल्याने मुलभूत सुविधांची वाणवा आहे. वडील वनमजूर असले तरी त्यांनी मुलांना शिकवलं. अर्जुन यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण शिरपूरला झालं. दहावीनंतर शिरपूर येथूनच विज्ञान शाखेतून बारावी केली. त्यानंतर मुंबईतील सायन येथील आयुर्वेदिक महाविद्यालयातून बीएएमएसची पदवी मिळवली.

बीएएमएस पदवी मिळवल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. दरम्यानच्या काळात गावातील प्रश्न, मूलभूत हक्क, तेथील लोकांच्या समस्या यांचा विचार सातत्याने मनात येत होता. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात मन रमत नव्हतं. सोबतचे सहकारी मित्र MPSC परीक्षेची तयारी करत होते. त्यामुळे स्पर्धा परीक्षेतून अधिकारी होऊन लोकांच्या समस्या सोडवाव्यात असा विचार मनात येऊ लागला. म्हणून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. याला घरच्यांनीही प्रतिसाद देत सहकार्य केले, असे डॉ. पावरा सांगतात.

मंत्रालयात कक्ष अधिकारी 2017 पासून एमपीएससीची तयारी सुरू केली आणि सुरवातीच्या काळात पुस्तक, अभ्यास हेच जीवन म्हणून स्वतःला झोकून दिले. 2-3 फेरीत अपयश हाती आले. मात्र त्यावर खचून न जाता प्रयत्न सुरूच ठेवले. अखेर 2020 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेत यश मिळालं. त्यांनी अनुसूचीत जमाती प्रवर्गातून राज्यातून द्वितीय क्रमांक मिळवला. मंत्रालयात कक्ष अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली.

उपजिल्हाधिकारी व्हायचं स्वप्न
मंत्रालयात कक्ष अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. मात्र, उपजिल्हाधिकारी होण्याचं स्वप्न होतं. म्हणून 2021 मध्ये पुन्हा राज्यसेवा परीक्षा दिली. यामध्ये पुन्हा एकदा घवघवीत यश मिळालं. डॉ. अर्जुन पावरा हे यंदा अनुसूचित जमाती प्रवर्गातून राज्यात पहिले आले आहेत. राज्यसेवा परीक्षेतील हा निकाल माझ्यासाठी अतिशय आनंददायी असून माझ्या कष्टाचं सार्थक झाल्याच्या भावना आहे. आगामी काळात मला उपजिल्हाधिकारी म्हणून पद मिळण्याची संभावना आहे, अशी माहिती डॉ.अर्जुन पावरा यांनी दिली. डॉ. पावरा यांचा हा प्रवास राज्यातील प्रशासकीय सेवेत जाण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

वडाळी रस्त्यावर रोकडसह कागदपत्रे चोरी

Next Post

पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी केली गारपीटग्रस्त भागाची पाहणी, तातडीने पंचनामे करण्याचे दिले प्रशासनाला निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add