Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पाणी आणणार : पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित

team by team
March 6, 2023
in राजकीय
0
प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पाणी आणणार : पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित

नंदुरबार l प्रतिनिधी

केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पाणी आणणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी केले.

नंदुरबार तालुक्यातील तलवाडे, बलवंड, खर्दे.खु. येथील सभागृह व रस्ता क्रॉक्रीटिकरण अशा विविध विकास कामांचे भूमीपूजन कार्यक्रम आज संपन्न झाला. यावेळी पालकमंत्री डॉ. गावित बोलत होते. यावेळी खासदार डॉ.हिना गावित, सरपंच (बलवड) सागर पाटील, सरपंच (तलवाडे) ताराबाई राजपूत, सरपंच (खोंडामळी) युवराज देसले, सरपंच (भोणे) पावबा धनगर, सरपंच नितीन पाटील (खर्दे. खु.) माजी जि.प.सदस्य रवी पाटील, सागर तांबोळी यांच्यासह लोकप्रतिनिधी, उपसरपंच व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री डॉ. गावित म्हणाले, आपल्या जिल्ह्यात नद्या व धरणामध्ये पुरेसा पाण्याचा साठा उपलब्ध असून हे पाणी प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत आणण्यासाठी प्रयत्न करणार असून या भागात एकदाची पाण्याची सोई झाल्यावर येथील शेतमालावर प्रक्रिया करण्यासाठी या भागात लहान मोठे कारखाने सुरु करु. यामुळे येथे रोजगाराची संधी उपलब्ध होऊन स्थलातर थांबेल. ज्या गरीब व्यक्तींना घरे नाही अशांना आदिवासी विकास विभागामार्फत मोठया प्रमाणात घरकुलाचे काम घेण्यात येत असून ज्या व्यक्तींचे ‘ड’ यादीत नाव सर्व आदिवासी बांधवांना 100 टक्के घरे देण्यात येईल. या भागातील विविध विकासकामासाठी पुढील वर्षी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. केंद्र सरकारने नवीन डी.पी, नवी सबस्टेशन सुरु करणे तसेच जुन्या वीजतारा बदलण्यासाठी निधी दिला असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वसाधारण श्रैणीतील नागरिकांनी रोजगार हमी योजनेचे कार्ड व कामगार कार्ड काढून शासकीय योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

खा. डॉ.हिना गावित म्हणाल्या की, विविध योजनेच्या माध्यमातून विठ्ठल मंदीर व मरीमाता मंदीरासाठी सभागृह, वीर एकलव्य सभागृहासाठी पुढील आर्थिक वर्षांत या कामासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच केंद्र सरकारच्या विविध योजनेतून आपल्या गावात 100 टक्के रस्ते व गटारी बांधण्यात येईल. केंद्र सरकार मार्फत दारिद्रय रेषेखालील लोकांना आरोग्याच्या उपचारासाठी आयुष्यमान कार्ड देण्यात येत असून या कार्डावर देशातील कोणत्याही रुग्णालयात दरवर्षी 5 लाखापर्यंतचा मोफत वैद्यकीय उपचार करण्यात येतो ज्या व्यक्तींने हे कार्ड बनविले नसतील अशा सर्व नागरिकांनी आयुष्यमान कार्ड काढण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

बातमी शेअर करा
Previous Post

आ.सत्यजीत तांबे यांची अभियांत्रिकी महाविद्यालय शहादा येथे सदिच्छा भेट

Next Post

अरे बापरे : गारांनी झोडपले,तुफानी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत

Next Post
अरे बापरे : गारांनी झोडपले,तुफानी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत

अरे बापरे : गारांनी झोडपले,तुफानी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add