नंदुरबार । प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील गुलीउंबर येथे दोन गटात वाद झाल्याने तिघांना दुखापत झाली असून परस्पर फिर्यादीतून तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, अक्कलकुवा तालुक्यातील गुलीउंबर येथील सागर शिवाजी वसावे हे गुलीउंबर फाट्याजवळ उभे असतांना अर्जुन मंजी वसावे याने दगडाने सागर वसावे यांना डोक्यावर मारुन दुखापत केली. याबाबत सागर वसावे यांच्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलिस ठाण्यात अर्जुन वसावे याच्याविरोधात भादंवि कलम ३२४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोहेकॉ.उल्हास ठिंगळे करीत आहेत. तसेच अर्जुन वसावे यांनी परस्पर दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, खापर गावाच्या यात्रेत नातेवाईकास मारहाण केली. या संशयावरुन अनिल नथ्थू, इंदूबाई गणेश वसावे यांनी दिनेश अर्जुन वसावे व वसंत किसन वसावे यांना दगडाने मारुन दुखापत केली. याबाबत अर्जुन वसावे यांच्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलिस ठाण्यात दोघांविरोधात भादंवि कलम ३२४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.निलेश वसावे करीत आहेत.








