नंदुरबार l प्रतिनिधी
मागील काही दशकांमध्ये भारतातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या सातत्याने वाढत आहे. आकडेवारीवरून असे दिसून येते की ही वाढ एक मोठी आव्हान ठरणार आहे आणि अशा प्रकारे शहरी व ग्रामीण भागातील जेष्ठांना विशेष सेवा पुरवण्यासाठी नवीन मॉडेल्सची आवश्यकता आहे, याचसाठी सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय – भारत सरकार यांनी सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशात राष्ट्रीय हेल्पलाईन (ELDERLINE-14567) सु
राष्ट्रीय हेल्पलाइन चा उददेश हा भारतातील ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी एक विश्वासार्ह राष्ट्रीय हेल्पलाइन तयार करून ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणे तसेच अत्याचार ग्रस्त वृद्ध व्यक्तींची काळजी घेण्यासाठी व इतर सेवांसाठी वेळेवेळी आपल्या सहकार्याची गरज भासणार आहे. तरी या राष्ट्रीय हेल्पलाईन संबंधी माहिती;
हेल्पलाइनचा टोल फ्री नंबर – १४५६७ आहे. सदर हेल्पलाइन मिळणाऱ्या सेवा खालील प्रमाणे:
माहिती– आरोग्य – जागरूकता, निदान, उपचार ● निवा
मार्गदर्शन– कायदेविषयक (वैयक्तिक आणि कौटुंबिक स्तरावर दोन्ही), विवाद निराकरण (मालमत्ता, शेजारी इ.) ● आर्थिक ● पेन्शन संबंधित ● सरकारी योजना ई.
भावनिक आधार देणे – चिंता निराकरण ● नातेसंबंध विषयक व्यवस्थापन ● मृत्यूशी संबंधित शोक ● जीवन व्यवस्थापन (वेळ, ताण, राग व्यवस्थापन; मृत्यूपूर्वीचे दस्तऐवजीकरण इ.)
क्षेत्रीय पातळीवर मदत– बेघर, अत्याचार ग्रस्त वृद्ध, , ज्येष्ठा हरवलेले व्यक्तींची सेवा व काळजी घेण्यासाठी ई.
तरी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व विनंती आहे की त्यांनी जास्तीत – जास्त संख्येने हेल्पलाइन 14567 ला कॉल करून महिती घ्यावी आणि आपल्या समस्याचे निराकरण करून घ्यावे असे आवाहन हेल्पलाइन चे क्षेत्रीय अधिकारी राहुल पवार यांनी केले.