नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील शिंदे केंद्र अंतर्गत येणाऱ्या कोळदा गावात केंद्रस्तरीय कला महोत्सवाच्या आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित यांच्या हस्ते करण्यात आलं आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली, शिंदे केंद्र अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या शाळांना सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आलं, त्यानंतर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करत जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ, सुप्रिया गावित यांच्या स्वागत केलं,

यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषद नेहमी अग्रेसर राहणार असून खेळाडू त्यासोबत अनेक स्पर्धेत भाग घेणारे कलाकार, चित्रकार, खेळाडू, असे आवड असणारे विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषद नेहमी सोबत राहणार असल्याचा विश्वास दिला, त्यासोबत खेळाडूंना खेळण्यासाठी मैदानाची व्यवस्था करून दिली जाणार आहे. तर खेळाडूंना चांगलं घडवण्यासाठी त्यांच्यासाठी प्रशिक्षक चांगल्या दर्जाचे मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार आहे. धावपटू कविता राऊत सारख्यांच्या मार्गदर्शन करण्यासाठी बोलवणार असल्याचे सांगितलं तर खेळाडूंसाठी लागणाऱ्या साहित्याची आवश्यकता असल्यास राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित व खा. डॉ. हिना गावित यांच्याकडे आपण मागणी करू शकतो त्यामुळे जिल्हा परिषदेची विद्यार्थ्यांना कुठल्याही गोष्टीची कमी पडू देणार नसल्याचे यावेळेस जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित यांनी विद्यार्थ्यांना आश्वासन दिले.
कार्यक्रमाला केंद्रप्रमुख मुख्याध्यापक आणि उपशिक्षक मोठे संख्येने उपस्थित होते तर पंचकुशीतील विद्यार्थी आणि नागरिकांचे देखील लक्षणीय उपस्थिती या कार्यक्रमाला होती,








