नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील शिवदर्शन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भालेर येथे मॅरेथॉन व सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी नंदुरबार येथील उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे व निम्स हॉस्पिटलचे संचालक डॉ. शिरीषकुमार शिंदे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून मॅरेथॉन व सायकल स्पर्धा सुरु करण्यात आली. याप्रसंगी श्री. हिरे यांनी सांगितले की, सध्याचे युग स्पर्धात्मक आहे. आणि या युगामध्ये अभ्यासा एवढेच महत्त्व खेळायला सुद्धा आलेला आहे. जो खेळाडू आंतरराष्ट्रीय लेवलला जातो, त्याचं पोलीस डिपार्टमेंट मध्ये डायरेक्ट सिलेक्शन होत असतं. त्यामुळे खेळाला आपल्या जीवनात स्थान द्यावं. एका निरोगी शरीरात निरोगी मन राहतं.
डॉ. शिरीषकुमार शिंदे यांनी सांगितले की, आपल्या सर्व महापुरुषांनी आपले शरीर निरोगी राहण्यासाठी काळजी घेतली व त्यामुळेच ते आपले कार्य अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकले. विद्यार्थ्यांनीसुध्दा आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी विवीध खेळ, व्यायाम याला महत्त्व द्यावे. सोबतच अभ्यासात सातत्य ठेवावे.
ही स्पर्धा दोन गटात घेण्यात आली.
सायकल स्पर्धा मुले लहान गट प्रथम – खगेंद्र पाटील,द्वितीय – ऋषिकेश पाटील,तृतीय – आदित्य पिंपळे,
मोठा गट प्रथम – गणेश पाटील,द्वितीय – हुसेन खाटीक, तृतीय – मुजमिल पिंजारी
मॅरेथॉन स्पर्धा मुले
लहान गट प्रथम नरेंद्र पाटील,द्वितीय ज्ञानेश्वर पाटील, तृतीय प्रणव पाटील,
मोठा गट प्रथम कृष्णा पाटील,द्वितीय कल्पेश पाटील,तृतीय पवन पाटील
सायकल स्पर्धा मुली
लहान गट प्रथम – कोमल पाटील,द्वितीय – तनुश्री पिंपळे, तृतीय – उन्नती पाटील
मोठा गट प्रथम – सुष्मिता पाटील, द्वितीय – नम्रता पटेल , तृतीय – दक्षता पाटील,
मॅरेथॉन स्पर्धा मुली
लहान गट प्रथम, नंदिनी पावरा, द्वितीय उन्नती पाटील,तृतीय अश्विनी पावरा
मोठा गट प्रथम – पूनम पावरा, द्वितीय – सुरेखा वसावे, तृतीय – साक्षी पवार
या विद्यार्थ्यांनी क्रमांक पटकावला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे प्राचार्य आर. एच. बागुल यांनी केले. सूत्रसंचालन एन.जी.पाटील यांनी तर आभार किरण बेडसे यांनी मानले. पर्यवेक्षक, सर्व शिक्षकवृंद, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. या प्रसंगी गावकरी मोठ्या संख्येने विद्यार्थ्याचा उत्साह वाढविण्यासाठी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या दोन्ही स्पर्धेत सहभाग घेतला.








