Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भालेर येथील शिवदर्शन विद्यालयात मॅरेथॉन व सायकल स्पर्धा उत्साहात 

team by team
February 1, 2023
in शैक्षणिक
0
भालेर येथील शिवदर्शन विद्यालयात मॅरेथॉन व सायकल स्पर्धा उत्साहात 
नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील शिवदर्शन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भालेर येथे मॅरेथॉन व सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी नंदुरबार येथील उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे व निम्स हॉस्पिटलचे संचालक डॉ. शिरीषकुमार शिंदे यांच्या हस्ते हिरवी झेंडी  दाखवून मॅरेथॉन व सायकल स्पर्धा सुरु करण्यात आली. याप्रसंगी श्री. हिरे यांनी सांगितले की, सध्याचे युग स्पर्धात्मक आहे. आणि या युगामध्ये अभ्यासा एवढेच महत्त्व खेळायला सुद्धा आलेला आहे. जो खेळाडू आंतरराष्ट्रीय लेवलला जातो, त्याचं पोलीस डिपार्टमेंट मध्ये डायरेक्ट सिलेक्शन होत असतं. त्यामुळे  खेळाला आपल्या जीवनात स्थान द्यावं. एका निरोगी शरीरात निरोगी मन राहतं.
 डॉ. शिरीषकुमार शिंदे यांनी सांगितले की, आपल्या सर्व महापुरुषांनी आपले शरीर निरोगी राहण्यासाठी  काळजी घेतली व त्यामुळेच ते आपले कार्य अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकले.  विद्यार्थ्यांनीसुध्दा आपले आरोग्य  चांगले ठेवण्यासाठी विवीध खेळ, व्यायाम याला महत्त्व द्यावे.  सोबतच अभ्यासात सातत्य ठेवावे.
ही स्पर्धा दोन गटात घेण्यात आली.  
सायकल स्पर्धा मुले  लहान गट प्रथम – खगेंद्र पाटील,द्वितीय –  ऋषिकेश पाटील,तृतीय – आदित्य पिंपळे,
मोठा गट प्रथम –  गणेश पाटील,द्वितीय –  हुसेन खाटीक, तृतीय – मुजमिल पिंजारी
 मॅरेथॉन स्पर्धा मुले
 लहान गट प्रथम नरेंद्र पाटील,द्वितीय ज्ञानेश्वर पाटील, तृतीय  प्रणव पाटील,
मोठा गट प्रथम कृष्णा पाटील,द्वितीय कल्पेश पाटील,तृतीय पवन पाटील
सायकल स्पर्धा मुली
लहान गट प्रथम – कोमल पाटील,द्वितीय – तनुश्री पिंपळे, तृतीय –   उन्नती पाटील
मोठा गट प्रथम – सुष्मिता पाटील, द्वितीय – नम्रता पटेल , तृतीय –  दक्षता पाटील,
 मॅरेथॉन स्पर्धा मुली
लहान गट प्रथम, नंदिनी पावरा, द्वितीय उन्नती पाटील,तृतीय अश्विनी पावरा
 मोठा गट प्रथम – पूनम पावरा, द्वितीय –  सुरेखा वसावे, तृतीय –  साक्षी पवार
या विद्यार्थ्यांनी क्रमांक पटकावला.
      कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे प्राचार्य आर. एच. बागुल यांनी केले. सूत्रसंचालन एन.जी.पाटील यांनी तर आभार किरण बेडसे यांनी मानले. पर्यवेक्षक, सर्व शिक्षकवृंद, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी  यांनी मोलाचे सहकार्य केले. या प्रसंगी गावकरी मोठ्या संख्येने विद्यार्थ्याचा उत्साह वाढविण्यासाठी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या दोन्ही स्पर्धेत सहभाग घेतला.
बातमी शेअर करा
Previous Post

दिव्यांगांच्या मदतीसाठी 4 फेब्रुवारीस शहाद्यात राज्यस्तरीय आर्केस्ट्राचे आयोजन

Next Post

लोंबकलेल्या विद्युत तारांची उपाययोजना करण्यात यावी : तळोदा राष्ट्रवादीतर्फे निवेदन

Next Post
लोंबकलेल्या  विद्युत तारांची उपाययोजना करण्यात यावी : तळोदा राष्ट्रवादीतर्फे निवेदन

लोंबकलेल्या विद्युत तारांची उपाययोजना करण्यात यावी : तळोदा राष्ट्रवादीतर्फे निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add