नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हातील नव्याने मंजूर झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला याहा मोगी देण्यात यावा अशी मागणी विश्व आदिवासी सेवा संघटनेने केली आहे.याबाबतचे निवेदन आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावीत,खा.डॉ हिना गावीत, जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावीत आदींना दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार हा जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा आहे . नंदुरबार जिल्हा निर्मितीनंतर शासकीय कार्यालये पूर्ण क्षमतेने उपलब्ध झाली आहेत , नंदुरबार जिल्हातील आरोग्य व्यवस्था सक्षम व बळकट करण्यासाठी व आरोग्याचा लाभ प्रत्येक गरजूंपर्यंत पोहोचण्यासाठी शासनाने नंदुरबार जिल्हा करिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केले आहे व त्या महाविद्यालयांचे कामकाज देखील सुरू आहे
नंदुरबार जिल्हातील सर्वसमावेशक व जनसामान्यांची भावना लक्ष्यात घेता नंदुरबार येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला आदिवासी समाजाचे आराध्य दैवत याहा मोगी देवमोगरा मातेचं नाव द्यावे हे सर्वसमावेशक असे हे नाव याहा मोगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं असे नामकरण करण्यात यावे अशी मागणी केंद्रीय संस्थापक अध्यक्ष जितेंद्र बागुल, सचिव संभाजी जगताप, सहसचिव विनायक गावीत,सदस्य सुभाष कोकणी, सदस्य सोनू कोकणी, महाराष्ट्र प्रदेश सचिव इंजि.किशोर पावरा, महाराष्ट्र प्रदेश सदस्य श्रीमती नलिनि बागुल, प्रदेश सदस्य श्रीमती सीमा मावची, नंदुरबार जिल्हा अध्यक्ष संतोष गावीत, जिल्हा अध्यक्ष गुलाब गावीत, अक्कलकुवा तालुका अध्यक्ष जितेंद्र तडवी, नंदुरबार तालुका अध्यक्ष परशराम कोकणी, नवापूर तालुका अध्यक्ष नितेश कोकणी,दिनेश सोनवणे,सतीश भुसावरे, सदस्य शरद पाडवी, कुणाल गावीत आदींनी केली.








