नंदुरबार | प्रतिनिधी
शेतकर्यांना शेतीपंपासाठी लागणारे विज कनेक्शनसाठी मीटर बसवा व शेतकर्यांना दिवसा विज मिळावी अशी मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांना बाळासाहेबांची शिवसेनेतर्फे देण्यात आले.
यानिवेदना म्हटले आहे की,जिल्ह्यातील शेतकर्यांच्या शेती साठी रात्री १२ वाजता विज मिळते. जगाचा पोशिंदा अन्नदाता वर या महावितरण कंपनी चा अन्याय का ? रात्री बारावाजे ऐवजी सायंकाळी ८ किंवा ९ वाजता रात्री विज दिली तर हा .शेतकरी निर्विघ्नपणे शेती करु शकेल.तसेच विद्युत वितरण कंपनी शेतकर्यांना लागणारी विजचे बिल हे पूर्ण वर्षाचे आकारणी करतात शेतकरी हा फक्त २४ तासात फक्त ८ तास विज वापर करतो व पावसाळा चे ५ महिने विजचा वापर करत नाही तरी विज बिल हे १२ ही महिन्याचे आकारण्यात येते.
जिल्ह्यातील शेतकरी हा महावितरण कंपनीने अवाजवी विज बिल शेतकर्यांवर आकारण्यात येत आहे. ते विज बिल शेतकरी हा भरणार नाही व याला जबाबदार महावितरण कंपनी असेल तरी शेतकर्यांचा प्रश्न आठ दिवसांत सोडावा अशी शेतकर्यांतर्फे करण्यात आली.सदरचे निवेदनावर बाळासाहेबांची शिवसेना उपजिल्हाप्रमुख कृष्णदास पाटील यांनी स्वाक्षरी आहे.








