नवापूर l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा शिक्षण विभागातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील परिक्षा पे चर्चाचे आयोजन नवापूरचा श्री.शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले होते.या माध्यमातून इयत्ता 9 ते 12 वीच्या विदयार्थ्यांकरीता सकाळी चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या.यानंतर लगेच या स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आले.
या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी नंदुरबार जिल्ह्याच्या खासदार डॉ. हिना गावित तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावीत, डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भरत गावित,जि प सदस्या संगीता गावित, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ.एम.व्ही.कदम,उपशिक्षणाधिकारी डॉ.युनस पठाण,गटशिक्षणाधिकारी रमेश चौरे, भाजपाचे अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष एजाज शेख,भाजपा शहराध्यक्ष प्रणव सोनार, रमला राणा,घनश्याम परमार जाकीर पठाण,
उपमुख्याध्यापक एस आर पहुरकर उपप्राचार्या के.सी.कोकणी, पर्यवेक्षक हरीश पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रथम द्वितीय व तृतीस आलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींना प्रमाणपत्र,ट्राफी तसेच इतर स्पर्धेकांना प्रमाणपत्र बक्षीस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.खा.डॉ. हिना गावित डॉ. सुप्रिया गावित,भरत गावीत,डॉ. एम.व्ही.कदम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. हिना गावित यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील परीक्षा पे चर्चा या विषयासंदर्भात मोलीक असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्चना बिरारी यांनी तर सुत्रसंचलन प्रशांत पाटील यांनी केले तर आभार गटशिक्षणाधिकारी रमेश चौरे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी श्री शिवाजी हायस्कूल, सार्वजनिक गुजराती व मराठी स्कूलच्या चित्रकला शिक्षकांनी परिश्रम घेतले.








