Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

स्पर्धेत जिंकण्योएक्षा सहभागी होणे देखील अत्यंत महत्वाचे : जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित

team by team
January 24, 2023
in राजकीय
0
स्पर्धेत जिंकण्योएक्षा सहभागी होणे देखील अत्यंत महत्वाचे : जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित
नंदुरबार |  प्रतिनिधी
स्पर्धेच्या युगात पराभवाला न घाबरता स्पर्धेत सहभागी होणे महत्वाचे असून विद्यार्थांनी पारितोषिक मिळाले नाही तरी नाराज न होता. सहभागी होणे महत्वाचे आहे. तसेच परीक्षा बाबत तणाव न घेता त्याला समोरे जा असे सांगत जि.प.अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांनी विद्यार्थांना प्रेरित केले. तसेच चित्रकला विषय बाबत त्यांचा विद्यार्थी दशेचे अनुभव स्पर्धकांना सांगितले.
     तर आमदार राजेश पाडवी यांनी बालपणी शिक्षणासाठी आश्रमशाळेत कसे शिकलो  तसेच शिक्षण कसे उपयुक्त असते याबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना सांगितले की, मी पण एक सर्व सामान्य कुटुंबाचा विद्यार्थी होतो पण अभ्यासाकडे लक्ष केंद्रित केल्यास यश निश्चित मिळते असे सांगत मार्गदर्शन केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून परीक्षेवर चर्चा या कार्यक्रम अंतर्गत जिल्हा परिषदेचे अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित तसेच शहादा-तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी व मान्यवरांचे उपस्थितीत घेण्यात आला. यावेळी उद्घाटक म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार राजेश पाडवी उपस्थित होते.
     देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१८ पासून परीक्षेपूर्वी परीक्षेवर चर्चा या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्यावरील परीक्षेचा कालावधीत येणारा ताण तणाव कमी करण्यासाठी आपले अनुभव सांगून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे या उपक्रमाचा उद्देश होता. हा एक अतिशय उपयुक्त असा उपक्रम विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या काळातील ताणतणाव मुक्त करण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. या कार्यक्रमांतर्गत चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी डॉ.शशिकांत वाणी, माजी उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी, दाज्या पावरा कैलास चौधरी, रामानंद ठाकरे, दीपक पाडवी, प्रतापपुर शाळेचे मुख्याध्यापक हेमलाल मगरे, नारायण ठाकरे, शिरीष माळी उपस्थित होते.
     सदर कार्यक्रम तळोदा येथील शिक्षण महर्षी प्राचार्य भाईसाहेब गो.हू.महाजन व शी. ल.माळी कनिष्ठ महाविद्यालयात पार पडला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुरेश जोहरी व आभार प्रदर्शन सुनिल सूर्यवांशी यांनी केले. स्पर्धेचे निवड समिती म्हणून कलाशिक्षक संकेत माळी, सुरेश जोहरी, अमोल टवाळे,  व्ही.टी.वसावे, आकाश टवाळे, इंद्रसिंग राजपूत यांनी काम पाहिले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य अजित टवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक ए.एल.महाजन, कार्यालयीन अधीक्षक डी.पी.महाले आदींनी सहकार्य केले.
बातमी शेअर करा
Previous Post

ग्रामीण भागातील तरूणांना मिळणार रोजगारासह कौशल्य प्रशिक्षण

Next Post

कंपनीकडून काकडीच्या बोगस बियाण्याची विक्री, चौपाळ्यातील शेतकऱ्याची फसवणूक; कारवाईची मागणी

Next Post
कर्जापोटी तारण मालमत्तेची परस्पर विक्री करून बँकेची साडेतीन कोटीत फसवणुक, सहा जणांविरूध्द गुन्हा

कंपनीकडून काकडीच्या बोगस बियाण्याची विक्री, चौपाळ्यातील शेतकऱ्याची फसवणूक; कारवाईची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add