Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

खांडबारा रस्त्यावर वाहन अडवून दरोडा, सात लाखाचा माल लंपास,आठ जणांविरूध्द गुन्हा, चौघांना अटक

team by team
January 23, 2023
in क्राईम
0
खांडबारा रस्त्यावर वाहन अडवून दरोडा, सात लाखाचा माल लंपास,आठ जणांविरूध्द गुन्हा, चौघांना अटक

नंदुरबार | प्रतिनिधी

नंदुरबार तालुक्यातील खांडबारा रस्त्यावर वाहनासमोर दुचाकी आडवी लावून सुमारे ७ लाख रुपये किंमतीचा किराणा माल जबरदस्तीने चोरुन नेल्याप्रकरणी आठ जणांविरूध्द उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार येथील शुभम पार्क सहारा टाऊन येथे राहणार्‍या सचिन भगवान पाटील हे त्यांच्या चारचाकी वाहनाने (क्र.एम.एच. ३९ एडी ११३३) किराणा माल घेवून गुली ओली फाट्याजवळून जात होते. यावेळी शांताराम कांतीलाल वळवी, नितीन संजय वळवी यांनी चारचाकी वाहनासमोर दुचाकी आडवी लावून वाहन थांबविले. तसेच सचिन पाटील यांना वाहनातून खाली उतरवित वाहनामध्ये विमल गुटखा असल्याचे सांगून वाहन तपासण्याचे सांगून जिवेठार मारण्याची धमकी दिली.

यावेळी सचिन पाटील यांनी वाहनात विमल गुटखा नाही असे सांगितले असता दोघांनी सचिन पाटील यांना वेडापावला गावाजवळ घेऊन जात त्यांच्या खिशातील मोबाईल काढून घेत जिवेठार मारण्याची धमकी दिली. तसेच सचिन पाटील यांना परत गुली ओली फाट्याजवळ सोडून त्यांचा मोबाईल परत केले. तसेच पप्पू, अंकुश देवानंद वळवी हसन विकास पाडवी, चंदुभैय्या (सोहेल कुरेशी), सचिन ठाकरे व नागो ठाकरे यांनी जबरदस्तीने सचिन पाटील यांचे ७ लाख रुपये किंमतीचे चारचाकी वाहन व २० हजार रुपये साखर कट्टे व परिवार तेलाचे डब्बे लूटून नेले.

याबाबत सचिन पाटील यांच्या फिर्यादीवरुन उपनगर पोलिस ठाण्यात आठ जणांविरोधात भादंवि कलम ३४१, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील शांताराम वळवी, नितीन वळवी, अंकुश देवानंद वळवी व हसन विकास पाडवी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रविण कोळी करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

पाच हजार नगरपालिका शिक्षकांचे आझाद मैदान येथे धरणे आंदोलन

Next Post

बाळासाहेबांची अन्यायाविरुद्ध लढण्याची शिकवण, विचार, वारसा घेऊन आमची वाटचाल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सैनिकी विद्यालयात २६/११ दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना अभिवादन

सैनिकी विद्यालयात २६/११ दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना अभिवादन

November 28, 2026
एल निनोच्या संभाव्य दुष्काळसदृश स्थितीवर नळवे खुर्द येथे जनजागृती; एस. ए. मिशन हायस्कूलचा स्तुत्य उपक्रम

एल निनोच्या संभाव्य दुष्काळसदृश स्थितीवर नळवे खुर्द येथे जनजागृती; एस. ए. मिशन हायस्कूलचा स्तुत्य उपक्रम

November 28, 2026
एस. ए. मिशन विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा

एस. ए. मिशन विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा

November 28, 2026
डॉ. विजयकुमार गावित यांनी मान्यता मिळवलेल्या नर्मदा–तापी वळण योजनेला भरघोस निधी; राज्य सरकारचे व पालकमंत्र्यांचे मानले आभार

डॉ. विजयकुमार गावित यांनी मान्यता मिळवलेल्या नर्मदा–तापी वळण योजनेला भरघोस निधी; राज्य सरकारचे व पालकमंत्र्यांचे मानले आभार

November 28, 2026
उत्तर प्रदेशचे अर्थमंत्री चौधरी यांच्या समवेत भाजपा संघटन बैठकीत डॉ. हिना गावित यांचाही प्रमुख सहभाग

उत्तर प्रदेशचे अर्थमंत्री चौधरी यांच्या समवेत भाजपा संघटन बैठकीत डॉ. हिना गावित यांचाही प्रमुख सहभाग

November 28, 2026
लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात पोलीस अंमलदार अटकेत; जिल्हा दलातून निलंबित

लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात पोलीस अंमलदार अटकेत; जिल्हा दलातून निलंबित

November 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add