Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मुस्लिम समाजाचा सामुहिक विवाह सोहळ्यात नऊ जोडप्यांचा विवाह

team by team
January 23, 2023
in राजकीय
0
मुस्लिम समाजाचा सामुहिक विवाह सोहळ्यात नऊ जोडप्यांचा विवाह

नंदुरबार l प्रतिनिधी

येथील इस्माईल दगु जनसेवा फाऊंडेशन, सदा जनसेवा फाऊंडेशन नंदुरबार व हाशमी कमेटी बिल्लीमोरा (गुजरात) यांच्या विद्यमाने घेण्यात आलेल्या सर्व मुस्लिम समाजबांधवांतील नऊ जोडप्यांचा विवाह लावण्यात आला. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी व यश मिळविणार्‍या समाजबांधवांचा स्मृतीचिन्ह देवुन सन्मान झाला.

 

 

नंदुरबार येथील बादशाह नगर मैदानात इस्माईल दगु जनसेवा फाऊंडेशन, सदा जनसेवा फाऊंडेशन नंदुरबार व हाशमी कमेटी बिल्लीमोरा (गुजरात) यांच्या विद्यमाने सामुहिक विवाह सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हाशमी कमिटीचे संस्थापक अध्यक्ष सैय्यद मोहम्मद हाशमीमींया होते. याप्रसंगी जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित, माजी उपनगराध्यक्ष परवेज खान, माजी नगरसेवक संजय सोनार, मोहन श्रॉफ, इस्माईल दगु जनसेवा फाऊंडेशन व सदा जनसेवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष एजाज बागवान, हाशमी कमिटीचे गनीभाई मेमन, मनोज चौधरी, मंगळ बाजार व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र चौधरी, भिल प्रदेश बिग्रेडचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडीत तडवी, माजी नगरसेवक अकबर शेख, डॉ.फरीद बागवान, हाजी गफार मस्तान, सिरत कमिटीचे चेअरमन सैय्यद मुस्तफा, उपाध्यक्ष सैय्यद याकुब, हाजी फारुक खाटीक आदी उपस्थित होते.

 

 

या सोहळ्यात महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेश राज्यातील मुस्लिम समाजातील एकुण नऊ वधू-वरांचा विवाह लावण्यात आला. यावेळी मदनी मस्जिदचे मुफ्ती उसामा कास्मी, जामा मस्जिदचे मौलाना आदील खाटीक यांनी मुस्लिम धार्मिक पध्दतीने विवाह लावला. तसेच नवविवाहित जोडप्यांना घरसंसारोपयोगी वस्तू भेट देण्यात आली. यावेळी इस्माईल दगु जनसेवा फाऊंडेशन व सदा जनसेवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष एजाज बागवान यांनी प्रास्ताविकातून सामुहिक विवाह सोहळ्यासह फाऊंडेशनच्या कार्याची माहिती दिली. तसेच यापुढे सर्वधर्मिय सामुहिक विवाह सोहळ्याच्या आयोजनासाठी प्रयत्न करणार असल्याचे एजाज बागवान यांनी सांगितले. हाशमी कमिटीचे संस्थापक अध्यक्ष सैय्यद मोहम्मद हाशमीमींया यांनी केलेल्या मार्गदर्शनातून समाजासाठी सामुहिक विवाह काळाची गरज असल्याचे सांगितले. तसेच समाजाच्या प्रगतीसाठी विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षित व्हावे, असे आवाहन केले.

 

 

 

या कार्यक्रमाचे औचित्य साधून इस्माईल दगु जनसेवा फाऊंडेशनच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन झाले. तसेच विविध क्षेत्रात यश मिळविणार्‍या समाजबांधवांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.आसिफ पठाण यांनी केले. आभार एजाज बागवान यांनी मानले. या कार्यक्रमास मुस्लिम समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी इस्माईल दगु जनसेवा फाऊंडेशन व सदा जनसेवा फाऊंडेशनचे उपाध्यक्ष असलम चौधरी, मुस्तफा चौधरी, नासिर बागवान, जमील खाटीक, शाकीर बागवान, सचिव दानिश बागवान, इरफान खाटीक, छन्नु पठाण, रिजवान बागवान, मकसुद सैय्यद आदींनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

भारतीय प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते होणार

Next Post

तुळाजा रस्त्यालगत झाडाला गळफास घेऊन अज्ञाताची आत्महत्या ?

Next Post
तुळाजा रस्त्यालगत झाडाला गळफास घेऊन अज्ञाताची आत्महत्या ?

तुळाजा रस्त्यालगत झाडाला गळफास घेऊन अज्ञाताची आत्महत्या ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add