प्रकाशा l प्रतिनिधी
प्रकाशा ता.शहादा येथे ऋषीपंचमी निमित्त महिलांची अलोट गर्दी झाली होती.असे असले तरी मंदिराचे द्वार बंद असल्याने महिलांची निराशा झाली. स्नान घाट ११ वाजे नंतर बंद करण्यात आल्याने महिला व व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली.
ऋषीपंचमीच औचित्त साधून प्रकाशा येथे केदारेश्वर महादेव मंदिर तापी स्नान घाटावर हजारो महिलांनी स्नान केलं. प्रतिकाशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रकाशा तीर्थ क्षेत्रावर सातत्याने वर्षभर विविध हिंदू तिथी पर्व निमित्ताने उत्सवादरम्यान भविकांची मोठी गर्दी होत असते,कोरोना मुळे गेल्या दीड वर्ष पासून राज्यातील सर्व मंदिर बंद करण्यात आली आहेत. कोरोना ने परत डोकं वर काढल्याने सरकारने दर्शनासाठी मंदिराचेद्वार आज पर्यंत बंद केली आहेत. प्रकाशा येथे सकाळचा सुमारास पावसाचा जोर असल्या भाविकांची कमी प्रमाणात गर्दी होती,मात्र दहा साडे दहा चा सुमारास पाऊस थांबल्याने भाविकांचा वाहनांचा फार मोठ्या प्रमाणात ताफा येऊ लागल्याने अचानक स्नान घाटावर स्नान करण्यासाठी महिलांची अमाप गर्दी वाढली होती, तापी नदी ला पूर आल्यामुळे महिलांनी स्नान घाटावरच पवित्र स्नान केले, ऋषी पंचमी निमित्त महादेवाचा अभिषेक पूजा विधी अर्चा केली, दर्शनासाठी मंदिर बंद असल्याने महिला भाविकांनी केदारेश्वर महादेव , पुष्पदंतेश्वर महादेव,काशीविश्वेश्वर ,संत दगाजी बापू मंदीर आदी मंदिराचा प्रंगणातूनच भाविकांनी दर्शन घेऊन समाधान मानलं,-दरम्यान पोलीस निरक्षक दीपक बुधवंत या ठिकाणी कुठलीही शिस्त न दिसल्याने गर्दी कमी होण्या करिता यांनी कडक कार्यवाई केली ,तरी ही अमाप गर्दी दिसून आली ,हवालदार सुनील पाडवी,पोलीस शिरसाठ ,राजपूत यांनी मंदिरा कडे जाणाऱ्या मोठ्या वाहनांना बंदी घातली होती,जिल्ह्यातील अनेक गावा सह पर प्रांतातील हजारो महिला भाविक वाहनासह हजेरी लावली होती.