नंदूरबार l प्रतिनिधी
तीसी ता. नंदुरबार येथील उपसरपंचपदी रतन चिंतामण भील यांची बिनविरोध निवड झाली.
काल रोजी तिसी ग्रामपंचायत उपसरपंच पदाची निवड ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली, निवडणूक अधिकारी म्हणून तालुका कृषी अधिकारी स्वप्निल शेळके यांनी काम पाहिले. त्यांना निवडणूक कार्यात ग्रामसेवक एन. पी. दहिफळे यांनी मदत केली.
तीसी ग्रामपंचायतची सात सदस्यांसाठी निवडणूक १८ डिसेंबर २२ रोजी घेण्यात आली. २० डिसेंबर २२ रोजी निवडणुकीच्या निकालात लोकनियुक्त सरपंच म्हणून दिलीप पोपट पाटील हे निवडून आले. तर सदस्य म्हणून रतन चिंतामण भिल ,रेखा किशोर पाटील, गायत्री हर्षल पाटील, सोनी राजू पवार, संजय निंबा पाटील, बारकू बायसिंग भील हे ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले.
उपसरपंच पदासाठी रतन चिंतामण भील बारकु बायसिंग भिल असे दोन जणांनी उपसरपंच पदासाठी अर्ज दाखल केला.मात्र बारकू बायसिक भील यांनी अर्ज माघारी घेतल्याने रतन भिल यांची उपसरपंच निवड बिनविरोध झाली. ही उपसरपंच निवड बिनविरोध होण्यासाठी यशवंत पाटील, दिलीप पाटील, एस.के.पाटील, किशोर पाटील, हर्षल पाटील, राजू पवार, सुधाकर पाटील, नंदू पाटील यांनी मध्यस्थी करत उपसरपंच निवड बिनविरोध केली.








