नंदुरबार | प्रतिनिधी
भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या वतीने राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेचे आयोजन १० ते १७ वर्षे वयोगटातील मुलांसाठी दरवर्षी होत असते यंदा लहान गटातून (१० ते १४ वर्षे) कु.शौर्या समर्थ व मृणाली चव्हाण यांच्या डेग्यूंचा डासांवरील पपई पासून बनविलेले औषध तसेच मोठया गटातून १४ ते १७ वर्षे अनुष्का शाह, संधिनी गांगुर्डे यांचा नंदुरबार जिल्ह्यासाठी सुर्यफुलाची शेती करण्याची आवश्यकता या प्रकल्पांची राष्ट्रीय स्तरावर निवड करण्यात आली आहे. दि.२७ ते ३१ जानेवारी २०२३ येथे अहमदाबाद येथे होणार्या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व या बालवैज्ञानिक करणार आहेत. अशी माहिती वात्सल्य सेवा समितीचे अध्यक्ष पंकज पाठक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी श्री.पाठक पुढे म्हणाले कि, भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या वतीने राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेचे आयोजन १० ते १७ वर्षे वयोगटातील मुलांसाठी दरवर्षी होत असते. या परिषदेत दोन मुलांच्या गटातर्फे दिलेल्या विषयावर लघुसंशोधन प्रकल्प सादर केले जातात. शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्याने राज्य स्तरावर जिज्ञासा ट्रस्ट ठाणे ता.नंदुरबार जिल्हास्तरावर विज्ञान पर्यावरण क्षेत्रात कार्य करणार्या वात्सल्य सेवा समितीतर्फे हा उपक्रम राबविला जातो. यंदा होणार्या ३० व्या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेसाठी मुख्य विषय स्वास्थ आणि कल्याणासाठी परिसंस्था समजून घेणे असा आहे.
या मुख्य विषयावर पाच उपविषयांवर नंदुरबार जिल्ह्यातून २६८ प्रकल्पांची नोंदणी जिल्हास्तरावर झाली होती. शिक्षकांच्या विज्ञान शिक्षक कार्यशाळा तालुकाशा शाळांवर जावून शिक्षक विद्यार्थ्यांबरोबर केलेल्या संवाद कार्यक्रमामुळे यंदा अभूतपुर्व प्रतिसाद दिला.
वात्सल्य सेवा समितीतर्फे भारताच्या स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षात आदिवासी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या आपल्या जिल्ह्यातून बाल वैज्ञानिक तयार व्हावे, संशोधनवृती लहानवयातच योग्य पध्दतीने विकसीत व्हावी, यासाठी संख्यात्मक व गुणात्मक स्तरावर कार्य केले गेले. ज्यात जैवविविधता विषय तज्ञ सौ.जुई पेठे (नाशिक) यांचे मार्गदर्शक शिक्षकांसाठीचे वर्कशॉप असेल किंवा डी.आर.हायस्कुल येथे नोंदणी केलेल्या बालविज्ञाकांनी प्रकल्प लेखन कसे करावे,
वात्सल्य सेवा समितीतर्फे भारताच्या स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षात आदिवासी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या आपल्या जिल्ह्यातून बाल वैज्ञानिक तयार व्हावे, संशोधनवृती लहानवयातच योग्य पध्दतीने विकसीत व्हावी, यासाठी संख्यात्मक व गुणात्मक स्तरावर कार्य केले गेले. ज्यात जैवविविधता विषय तज्ञ सौ.जुई पेठे (नाशिक) यांचे मार्गदर्शक शिक्षकांसाठीचे वर्कशॉप असेल किंवा डी.आर.हायस्कुल येथे नोंदणी केलेल्या बालविज्ञाकांनी प्रकल्प लेखन कसे करावे,
प्रकल्प विषयात पुढे केस जावे यासाठी शहरातील नामांकित आर्किटेक्चर हेमंत चलियावाल, निरज देशपांडे, डॉ.निर्मल गुजराथी, डॉ.श्रुती शाह, जीटीपीचे प्रा.डॉ.अनिल कुलकर्णी, कृषी विज्ञान केंद्र कोळदे यांचे विषयतज्ञ सौ.आरती देशमुख, श्रॉफ हा यस्कुलचे प्रा.नितीन देवरे आदी विज्ञानप्रेमींचे प्रत्यक्ष मार्गदर्शन मुलांना व त्यांच्या मार्गदर्शन शिक्षकांना देण्यात आले. संशोधनवृत्तीला घरातूनही प्रोत्साहन मिळावे यासाठी बाल वैज्ञानिकांच्या पालकांबरोबर डॉ.गजानन डांगे (राष्ट्रीय अध्यक्ष योजक) यांचा संवाद कार्यक्रम आयोजित केला आहे.
या सर्व प्रयत्नातून १७ प्रकल्प यंदा राज्यस्तरावर निवडण्यात आली. या १७ प्रकल्पातून लहान गटातून (१० ते १४ वर्षे) कु.शौर्या समर्थ व मृणाली चव्हाण यांच्या डेग्यूंचा डासांवरील पपई पासून बनविलेले औषध तसेच मोठया गटातून १४ ते १७ वर्षे अनुष्का शाह, संधिनी गांगुर्डे यांचा नंदुरबार जिल्ह्यासाठी सुर्यफुलाची शेती करण्याची आवश्यकता या प्रकल्पांची राष्ट्रीय स्तरावर निवड करण्यात आली आहे.
दि.२७ ते ३१ जानेवारी २०२३ येथे अहमदाबाद येथे होणार्या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व या बालवैज्ञानिक करणार आहेत. हाच विषय पुढील वर्षही असल्याने पुढच्या वर्षीसाठी अधिक सहभाग होण्याचा प्रयत्न वात्सल्य सेवा समितीतर्फे होणार आहे. असे वात्सल्य सेवा समितीचे अध्यक्ष पंकज पाठक यांनी पत्रकार परिषदेत सांगीतले.