Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नूतन सरपंच व सदस्यांवर गावाच्या विकासाची खूप मोठी जबाबदारी : आ. आमश्या पाडवी

team by team
December 27, 2022
in राजकीय
0
नूतन सरपंच व सदस्यांवर गावाच्या विकासाची खूप मोठी जबाबदारी : आ. आमश्या पाडवी

अक्कलकुवा  |  प्रतिनिधी

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत तालुक्यातील जनतेने केवळ सदस्य व सरपंच यांना निवडून दिले नाही तर त्यांच्यावर गावाच्या विकासाची खूप मोठी जबाबदारी टाकली आहे आणि ती नूतन सरपंच आणि सदस्यांनी लोकांचा विश्वास सार्थ ठरवून ती यशस्वीरित्या पार पाडावी असे प्रतिपादन विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांनी केले.

तालुक्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडुन आलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचे आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते भव्य सत्कार संपन्न झाला. यावेळी आमदार आमश्या पाडवी बोलत होते. अक्कलकुवा येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संपर्क कार्यालयात भव्य सत्कार संपन्न झाला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती शंकर पाडवी, जिल्हा संघटक लक्ष्मण वाडीले, अक्कलकुव्याचे माजी सरपंच प्रेमचंद जैन, युवासेना जिल्हा प्रमुख ललित जाट, जेष्ठ नेते पृथ्वीसिंग पाडवी, तालुका प्रमुख मगन वसावे, आरिफ मक्राणी, जुबेर मक्राणी, छोटु हाश्मी, सरपंच संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र वसावे, आनंद वसावे, आदी उपस्थित होते.

यावेळी आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते अक्कलकुव्याच्या लोकनियुक्त सरपंच उषाबाई बोरा, सोरापाडा सरपंच अंजू आमश्या पाडवी, घंटाणी सरपंच विकेश जेका पाडवी, विरपुर सरपंच अजीत सुभाष तडवी, पोरांबी सरपंच संगिता नरेश वळवी, टावली सरपंच बबिता राजेंद्र वसावे, खड़कुना सरपंच मोगराबाई दशरथ वळवी, कोलवीमाळ सरपंच गुमानसिंग बिज़्या तडवी,चिवलउतार सरपंच दिनेश खात्र्या वसावे, पेचरीदेव ग्रामपंचायतीचे बिनविरोध सरपंच वसंत हुरजी पाडवी, यांचा व सर्व नव निर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी आमदार आमश्या पाडवी यांनी मार्गदर्शन केले. लक्ष्मण वाडीले, ललित जाट, विनोद वळवी यांनीही याप्रसंगी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाला सरपंच कुवरसिंग वसावे, राजेंद्र वसावे, पोहरा सरपंच अश्विन तडवी, काकड़खूंट सरपंच विनोद वळवी, माजी तालुका प्रमुख जयप्रकाश परदेशी, जी डी पाडवी, छोटू हाशमी, शहर प्रमुख रविन्द्र चंदेल, तालुका उप प्रमुख तुकाराम वळवी, किशोर ठाकुर, युवानेते कुणाल जैन, रोहित सोनार, जिग्नेश सोनार, गोलू चंदेल,आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी तसेच निवडुन आलेले. ग्रामपंचायत सदस्य व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

मोलगी गावाजवळ वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Next Post

पालिका रस्ता भुमीपूजन कार्यक्रमाचा फलकावरून बांधकाम सभापती व भाजपचा नगरसेविका नाव गायब

Next Post
पालिका रस्ता भुमीपूजन कार्यक्रमाचा फलकावरून बांधकाम सभापती व भाजपचा नगरसेविका नाव गायब

पालिका रस्ता भुमीपूजन कार्यक्रमाचा फलकावरून बांधकाम सभापती व भाजपचा नगरसेविका नाव गायब

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add