Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

गायरान जमिनीवरील अतिक्रमणप्रकरणी २४ जानेवारीपर्यंत उच्च न्यायालयाची स्थगिती

team by team
December 22, 2022
in राज्य
0
इलेक्ट्रीक मोटर चोरणारा सराईत टोळी जेरबंद, ३० हजाराचा मुद्देमाल हस्तगत

नंदुरबार  | प्रतिनिधी

राज्यातील गायरान जमिनीवरील अतिक्रमणांना राज्य सरकारने बजावलेल्या नोटीसांना दिलेली स्थगिती उच्च न्यायालयाने २४ जानेवारी पर्यंत कायम ठेवली आहे.
सध्या नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. संबधीत अधिकारी अधिवेशनात व्यस्त असल्याने राज्य सरकारच्या वतीने ऍड आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयाकडे वेळ मागितला. याची प्रभारी मुख्य न्या.संजय गंगापूरवाला यांनी आणि न्या.एस.जी.चपळगावकर यांच्या खंडपीठाने दखल घेत यापूर्वी दिलेली स्थगिती कायम करत सूनावणी तहकूब ठेवली आहे.

गायरान जमिनीवरील बाधकामासंबंधी सरकारने बजावलेल्या नोटिसी विरोधात केसूर्डी जि.सातारा गावच्या दोनशे शेतकरी कुटुंबांनी या संदर्भात न्यायालयाला पत्र लिहिले. त्यांचा पत्राची गंभीर दखल घेत न्यायालयाने सुमोटो याचिका दाखल करून घेतली आहे. या याचिकेवर सोमवारी न्या.संजय गंगापूरवाला व न्या.एस.जी.चपळगावकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी ऍड आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयाकडे वेळ मागून घेतला.

याची दखल घेत खंडपीठाने सरकारच्या नोटीसांना देण्यात आलेली स्थगिती जैसे थे ठेवत पुढील सुनावणी २४ जानेवारीपर्यंत तहकूब ठेवली. या आदेशामुळे राज्यभरातील गायरान जमिनीवरील जवळपास दोन लाख सत्तर हजारांहून अधिक शेतकरी कुटुंबांना दिलासा मिळाला आहे.तळोदा तालुक्यातील सरकारी गायरान जमिनीवर अतिक्रमण करून झोपडी, कच्ची घरे व पक्की इमारत उभी बांधणार्‍या पाचशे पन्नास जणांना तहसीलदारांनी पंधरा दिवसांपूर्वी नोटीसा बजावून  दहा दिवसांच्या आत अतिक्रमण नियमानूकल आहे किंवा काय? याबाबत पूरावे सादर करावेत अन्यथा निष्कासीत करण्यात येईल असा इशारा दिला होता. मात्र, न्यायालयाचा स्थगितीमुळे तळोदा तालुक्यातील ५५० गायरान जमिनीवरील अतिक्रमणधारकांना दिलासा मिळाला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

श्री सम्मेदशिखर जैन महातीर्थला पर्यटन स्थळ घोषित केल्याचा अक्कलकुव्यात निषेध

Next Post

मुंबई सेंट्रल ते दोंडाईचा दरम्यान उद्यापासून नविन प्रवाशी रेल्वे धावणार,आठवडयात तीन दिवस धावणार

Next Post
मुंबई सेंट्रल ते दोंडाईचा दरम्यान उद्यापासून नविन प्रवाशी रेल्वे धावणार,आठवडयात तीन दिवस धावणार

मुंबई सेंट्रल ते दोंडाईचा दरम्यान उद्यापासून नविन प्रवाशी रेल्वे धावणार,आठवडयात तीन दिवस धावणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add