सारंगखेडा l प्रतिनिधी
येथील एकमुखी दत्त प्रभूच्या यात्रोत्सवाला आज भाविक , यात्रेकरु , शौकिनाची गर्दी वाढली आहे . यात्रेकरुंचे पावले यात्रोत्सवाकडे वळत आहेत . यात्रोत्सवानिमित्त भरणारा अश्व बाजार बहरला आहे . अश्वाच्या खरेदी विक्रीत आतापर्यंत २५० अश्वांची विक्री तून ७० लाख रुपयांची उलाढाल झाली आहे . अश्व बाजारात सर्वात उंच अश्व उज्जैन चा शेरा लक्ष वेधत आहे .
येथील यात्रोत्सवातील अश्व बाजारातील खरेदी विक्रीला तेजी आली आहे . देशातील विविध भागांतून दोन हजार घोड्यांसह विक्रेते दाखल झाले आहेत . या बाजारात शुक्रवारी ( ता. ९ ) दाखल झाला तो म्हणजे शेरा नावाचा देखणा अश्व रुबाबदार , पांढरा शुभ्र , दोन हजार घोडयांमध्ये सर्वात उंच असा त्याचा रुबाब हा अश्व मारवाड जातीचा असून , बढनगर जिल्हा उज्जैन ( मध्य प्रदेश ) येथील दिपक चौधरी यांचा अश्व आहे . शेरा चे वय. ७ वर्ष व उंची ६२ ईच आहे . त्याचे डोळे भुरसट असून , पांढराशुभ्र वर्ण आहे . त्याचा वर रोज पाच हजार रुपये खर्च असून , त्याला पाहण्यासाठी अश्व बाजारात गर्दी वाढली आहे .
घोडे बाजार तेजीत
येथील अश्व बाजार आज पासून तेजीत आला आहे . दिवसभरातून ११० अश्वांची विक्रीतून २६ लाखाची उलाढाल झाली आहे . आज अखेर पर्यंत एकूण घोडे विक्री संख्या २५० झाली असून ७० लाखाची उलाढाल झाली आहे . येथील खरेदी विक्रीचा व्यवहार शहादा कृषी उत्पन्न बाजार समिती च्या उपकेंद्र करीत आहेत .









