नंदुरबार ! प्रतिनिधी
नंदुरबारचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ मल्लिनाथ कलशेट्टी यांचे निधन झाल्याचा कोणीतरी खोडसाळपने मॅसेज टाकला होता.मात्र डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांची तब्बेत ठणठणीत आहे.त्यामुळे अशा चुकीच्या मॅसेज ला बळी पडू नये.
नंदुरबारच्या तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ मल्लिनाथ कलशेट्टी यांची तब्येत ठणठणीत आहे कोणीतरी नंदुरबार जिल्ह्यात चुकीचा मेसेज टाकला आहे .त्याच्यामुळे गैरसमज झाला आहे. तर हा गैरसमज दूर करावा ही विनंती याबाबत नवनिर्माण संस्थेचे
रवी गोसावी यांनी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याशी चर्चा केली असता त्यांची तब्बेत ठणठणीत असल्याचे समजले.
आज दि.२७ रोजी नंदुरबार जिल्ह्यातील विविध व्हॉटसअप ग्रुप वर डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांचे निधन झाल्याचे मॅसेज फिरत होते.या मॅसेज वर कुणीही विश्वास ठेवू नये.








