शहादा l प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेच्या नंदुरबार जिल्हा अध्यक्षपदी प्रा. मेहमूद गुलाब खाटीक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आयडीयल इंग्लिश मिडीयम स्कूल शहादा येथे महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेची बैठक आयोजित करण्यात आली होती. समता शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष प्रा.भरत शिरसाठ यांच्या हस्ते प्रा. मेहमूद खाटीक यांना नंदुरबार जिल्हाअध्यक्ष म्हणून नियुक्ती पत्र देण्यात आले. प्रदेश कार्यकारणी सदस्य व जळगाव जिल्हा अध्यक्ष रणजीत सोनवणे हे कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते.
रमेश बिरारे, प्रा. विजय पाटील व धनराज अहिरे यांना उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती देण्यात आली. यावेळी शहादा येथिल विष्णू जोंधळे, जितेंद्र कुवर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास विनायक सावळे, जगदीश आगळे,अ.रहीम शेख,अशोक सोनवणे, प्रा.देवेंद्र निकम, साजिद शेख, अहेमद शेख, साजिद बागवान, प्रविण पवार,जुल्फेकार सैय्यद, यांच्यासह अनेक शिक्षक उपस्थीत होते. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन धनराज अहिरे यांनी केले तर आभार प्रदर्शन भिमराव निकुंबे यांनी मानले.