Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

खून प्रकरणात जामीन मंजूर करण्याचे मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबादचे महत्त्वपूर्ण आदेश

team by team
December 9, 2022
in क्राईम
0
खून प्रकरणात जामीन मंजूर करण्याचे मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबादचे महत्त्वपूर्ण आदेश
नंदुरबार l प्रतिनिधी
कथित खून प्रकरणात जामीन मंजूर करण्याचे मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबादचे महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत.
 याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांनी आरोपींविरुद्ध गुन्हा भा. द. वी. कलम ३०२ प्रमाणे पोलीस स्टेशन धडगाव येथे नोंदविला होता. थोडक्यात माहिती फिर्याद प्रमाणे अशी की, फिर्यादीची मुलगी ही एका सूतगिरणीत कार्यरत होती. ती भविष्य निर्वाह निधीची रक्कम घेण्यासाठी बाहेरगावी गेली होती. फिर्यादीची दुसरी मुलगी ही सतर्क संपर्कात होती. परंतु त्यानंतर संपर्क झाला नव्हता. फिर्यादीला वाटले की, मावशीच्या घरी धडगावला थांबली असेल. परंतु साक्षीदाराने फिर्यादीच्या पुतण्याला कळविले की, काही कागदपत्रे घटनास्थळावर मिळून आले आहेत. फिर्यादीच्या वडिलांनी शोध घेतला असता कागदपत्रांसोबत मुलगी मयत अवस्थेत आढळली.
फिर्यादीने सदर फिर्याद अज्ञात व्यक्तीच्या नावाने नोंदविली होती. परंतु पुढील जबाबात आरोपीचे नाव घेण्यात आले होते. आरोपीची  १२ मे २०२२ रोजी अटक करण्यात आली होती. सदर प्रकरणात आरोप पत्रही दाखल करण्यात आले होते.संशयित आरोपीने  सत्र न्यायालय शहादा, जामीन मंजूर करण्यासाठी जामीन अर्ज दाखल केला होता. परंतु  सत्र न्यायालय शहादा, यांनी सदर अर्ज नामंजूर करण्याचे आदेश पारित केले होते. सदर आदेशाविरुद्ध अर्जदार मनोज वळवी, रा.  अक्कलकुवा, यांनी  मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे जामीन अर्ज दाखल केला होता. सदर प्रकरणात जामीन न देण्यासाठी हस्तक्षेप अर्जही दाखल केला होता.  मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद ( न्यायमूर्ती एस. जी. मेहरे) यांनी  ७ डिसेंबर २०२२ रोजीच्या आदेशान्वये जामीन मंजूर करण्याचे महत्त्वपूर्ण आदेश पारित केले. अर्जदारतर्फे ॲड. गजेंद्र देवीचंद जैन यांनी काम पाहिले.
बातमी शेअर करा
Previous Post

काय सांगता : अश्वप्रेमीने चक्क आपल्या लाडक्या बादलचा केक भरून वाढदिवस केला साजरा

Next Post

जी-२० परिषदेसाठी सजतेय ‘आपली मुंबई’

Next Post
जी-२० परिषदेसाठी सजतेय ‘आपली मुंबई’

जी-२० परिषदेसाठी सजतेय ‘आपली मुंबई’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026
नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

June 23, 2026
शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

June 23, 2026
आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add