सारंगखेडा l प्रतिनिधी
तरुण मंडळीकडून सध्याच्या डिजिटल युगात वाढदिवस मोठया प्रमाणात साजरे होत आहेत . मात्र शिंदखेडा तालुक्यातील चिलाणे येथील अश्वप्रेमीने चक्क आपल्या लाडक्या बादल नावाच्या अश्वाचा येथील यात्रोत्सवात दत्ताच्या साक्षीने अश्वाला केक भरून वाढदिवस साजरा केला .
येथील ऐतिहासिक यात्रोत्सवाला सुरूवात झाली आहे .यात्रेतील अश्व बाजारात शिंदखेडा तालुक्यातील चिलाणे येथील संजय पाटील यांनी आपला आवडता बादल नावाचा अश्व आणला आहे . या अश्वप्रेमीने या अश्वाचा वाढदिवस दत्त मंदिरात येऊन दत्ताच्या साक्षीने साजरा केला .संजय पाटील यांना अश्व पाळण्याचा छंद आहे .
त्यांच्याकडे सात अश्व आहेत या घोड्यांपैकी बादल नावाचा घोडा हा त्यांचा आवडता आहे . दरवर्षी यात्रोत्सवाला दत्त प्रभूच्या साक्षीने बादलचा वाढदिवस साजरा करतात . दिलीप पाटील यांनी 23 वर्षांपूर्वी पंचवीस हजार पाचशे रुपयाला हा बादल येथील अश्व बाजारातून खरेदी केला होता . दरवर्षी येथे बादलचा वाढदिवस साजरा करतात .
चेतक फेस्टिवल समितीचे अध्यक्ष जयपालसिंह रावल यांच्या हस्ते केक भरवत वाढदिवस साजरा करण्यात आला . यावेळी सरपंच पृथ्वीराजसिंह रावल उपस्थित होते . संजय पाटील हे या अश्वाला वरातीसाठी मुंबई , नासिक , पुणे मध्य प्रदेश गुजरात राज्यांमध्ये घेऊन जातात . बादल हा उत्तम नृत्य करतो देवाला नमस्कार करणे , मालकाने दिलेल्या सर्व आदेशाचे तंतोतंत पालन करणे . बादल याचा अनेक पशुप्रदर्शन त्याचबरोबर नृत्य स्पर्धा यामध्ये सहभाग असतो . त्यातून बादल पुरस्कार मिळाले आहेत पशुप्रदर्शनात देखील बादलला अनेक वेळा गौरविण्यात आले आहे. अश्वावर असणारे प्रेम पाहून मंदिरावर दर्शनासाठी आलेले भाविक व यात्रेकरू यांनी विशेष कौतुक केले.