नंदूरबार l प्रतिनिधी
गुजरात विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्ह्यात ऑपरेशन ऑल आऊट / कोबींग / नाकाबंदी राबविण्यात आले.
आगामी काळात गुजरात राज्यात विधानसभा निवडणूक-2022 च्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्याच्या सिमेला लागून गुजरात राज्यात असलेल्या सिमावर्ती भागात निवडणूक प्रक्रिये दरम्यान समाजकंटकांवर व गुन्हेगारांवर अंकुश राहावा तसेच निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पाडावेत यासाठी खबरदारी म्हणून नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांचे नेतृत्वाखाली 23 नोव्हेंबर च्या रात्री नंदुरबार जिल्ह्यात ऑपरेशन ऑल आऊट / कोबींग / नाकाबंदी राबविण्यात आले होते.
ऑल आऊट ऑपरेशनचा मुख्य उद्देश हा सिमावर्ती भागात निवडणूक प्रक्रिये दरम्यान समाजकंटकांवर व गुन्हेगारांवर अंकुश राहावा तसेच निवडणूका भयमुक्त वातावरणात पार पाडावेत असा होता.
त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांचे मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत ऑपरेशन ऑल आऊट राबविण्याबाबत नियोजन केले. ऑपरेशन ऑल आऊट दरम्यान पोलीस ठाणे अभिलेखावरील सराईत गुन्हेगार, हद्दपार आरोपी फरार, पाहिजे, फेर अटक आरोपी, अवैध शस्त्रे बाळगणारे, हिस्ट्रीशिटर्स, गँग हिस्ट्रीशिटर्स, रात्री घरफोडी करण्याच्या उद्देशात असलेले चोरीच्या वस्तू बाळगणारे, रात्रौ संशयीतरीत्या फिरणारे, कारागृहातुन सुटुन आलेले आरोपीतांचा शोध घेवुन जास्तीत जास्त गुन्हेगार ताब्यात घेवुन त्यांच्याविरुध्द् कायदेशीर कारवाई करणेबाबतच्या तसेच मालमत्तेविरुध्दचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सर्व उप- विभागीय पोलीस अधिकारी व सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना दिल्या होत्या.
23 नोव्हेंबरच्या रात्री ऑपरेशन ऑल आऊट सुरु करण्यात आले. यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील 36 अधिकारी व 178 अमंलदार नेमण्यात आले होते व संपुर्ण ऑल आऊटचे नेतृत्व नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, हे स्वत: करुन नाकाबंदी / कोबींग ऑपरेशन / ऑपरेशन ऑल आऊट बाबत जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांना भेटी देत होते. अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उप विभागीय पोलीस अधिकारी, नंदुरबार सचिन हिरे, उप विभागीय पोलीस अधिकारी, शहादा श्रीकांत घुमरे, उप विभागीय पोलीस अधिकारी संभाजी सावंत व सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर असे सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आप- आपल्या पथकाचे नेतृत्व करुन कारवाई करीत होते.
ऑपरेशन ऑल आऊट दरम्यान नंदुरबार शहर पोलीस ठाणे शहरातील महाराणा प्रताप चौकात एक इसम विना परवाना लोखंडी बनावटीचे पिस्टल कब्जात बाळगुन संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना मिळाल्याने त्यांनी नंदुरबार शहरात ऑपरेशन ऑल आऊट राबवित असलेले स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस हवालदार महेंद्र नगराळे, पोलीस नाईक राकेश मोरे पोलीस अंमलदार अभय राजपुत, आनंदा मराठे यांना कळविल्याने त्यांनी महाराणा प्रताप चौकात जावुन शोध मोहिम राबविली असता कंजरवाडा येथील भिंती लगत एका संशयीतास ताब्यात घेवुन त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कब्जात 25 हजार रुपये किमतीचे एक गावठी बनावटीचे लोखंडी पिस्टल मिळुन आल्याने त्याच्या विरुध्द् नंदुरबार शहर पोलीस ठाण्याला भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
तसेच नंदुरबार शहर व शहादा पोलीस ठाणे हद्दतीत संशयीत इसमांकडे मानवी जिवीतास घातक असलेली धारदार तलवार मिळुन आल्याने 3 आरोपीतांविरुध्द् भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे गैरकायदा लोखंडी हत्यार जात बाळगतांना मिळुन आलेल्या 3 आरोपीतांकडुन 3 तलवारी हस्तगत करण्यात आलेल्या आहेत.
राजमंगल सत्यानारायण झा यांचा 6 हजाराचा मोबाईल चोरी झाला म्हणून नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील संशयीत आरोपी परेश ऊर्फ माऊ बापू हरदास रा. नगरपालिका शाळा क्रमांक-01 जवळ, नंदुरबार यास ताब्यात घेवून त्याच्या ताब्यातून मोबाईल हस्तगत करुन चोरीचा गुन्हा उघडकीस करण्यात आलेला आहे.
चोरी करण्याच्या उद्देशाने तसेच स्वतःचे अस्तीत्व लपवुन संशयास्पदरीत्या फिरत असतांना मिळुन आलेले 5 रेकॉर्डवरील आरोपीतांविरुध्द् महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 122 प्रमाणे विविध पोलीस ठाणेत गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांच्याकडून चोरी करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य हस्तगत करण्यात आले. 7 संशयीत इसमांच्या ताब्यात मिळुन आलेल्या मालमत्ते बाबत समाधानकारक उत्तरे न दिल्याने त्याच्याविरुध्द् जिल्ह्यातील विविध पोलीस पोलीस ठाण्यांमध्ये महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 124 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
ऑपरेशन ऑल आऊट दरम्यान 21 दारुबंदीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यामध्ये 8 लाख 89 हजार 800 रुपये किमंतीची देशी विदेशी दारु, बियर व त्याची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारे वाहन असा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.नंदुरबार जिल्ह्यात प्रलंबीत असलेल्या नॉन बेलेबल वॉरंटपैकी 37 नॉन बेलेबल वॉरंट व 56 बेलेबल वॉरंटची बजावणी करण्यात आली. तसेच नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या अभिलेखावर असलेले 58 हिस्ट्रीशिटर्स तपासण्यात आले आहे.
नंदुरबार जिल्हा हद्दीतुन 2 वर्षांसाठी हद्दपार केलेला आकाश राजु शेमळे रा. सुलवाडे पो. सुलतानपुर ता. शहादा जि. नंदुरबार हा नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांची अथवा न्यायालयाची कुठलीही पुर्व परवानगी न घेता त्याच्या राहते घरी मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवून त्यांचे विरुध्द् महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे म्हसावद पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडुन गुन्हेगारांवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर केलेल्या कारवाईमुळे गुन्हेगारांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले असुन नागरीकांनी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने केलेल्या कारवाईबाबत समाधान व्यक्त केले आहे.
सदरची कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, नंदुरबार पी. आर. पाटील यांच्या नेतृत्वाखाली अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी, नंदुरबार सचिन हिरे, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी, शहादा श्रीकांत घुमरे, अक्कलकुवा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संभाजी सावंत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर व सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, अमंलदार यांनी केलेली असुन पुढील काळात देखील ऑपरेशन ऑल आऊट (कोंबींग व नाकाबंदी) योजना संपुर्ण जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.








