नंदुरबार l प्रतिनिधी
खड्डे चुकवण्याचा नादात स्कूल बस आणि ट्रकची धडक झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने विद्यार्थ्यांना दुखापत झाली नाही.
नंदुरबार शहरातील धुळे चौफुली बायपास रोडवर खड्डे चुकवण्याच्या नादात पी.जी. पब्लिक स्कूलची स्कूल बस आणि मालवाहू ट्रक यांच्यात धडक झाली असून या अपघातात विद्यार्थ्यांना कुठलीही दुखापत झाली नसली तरी दोन ते तीन विद्यार्थी आणि चालक किरकोळ जखमी झाले आहे.
अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी ट्रक चालकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे . खड्ड्यांच्या संदर्भात नागरिकांनी वारंवार महामार्ग प्रशासनाकडे निवेदन देऊनही खड्डे भरले जात नसल्याने या ठिकाणी अपघाताच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.तर दुसरीकडे स्कूल बसचा अपघात झाल्याने पालकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.काळ आला होता मात्र वेळ न होती त्यामुळे विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची इजा झाली नाही.मात्र या ठिकाणी मोठ्या अपघातांची शक्यता नाकारता येत नाही.








