नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार येथील कंजरवाडा परिसरातील रायलाल नगर प्रवेशद्वाराचे उद्घाटन शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी व शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. विक्रांत मोरे यांच्या हस्ते झाले. शहरातील विकास कामांसाठी नगरपालिका कटीबद्ध असून येणार्या काळात परिसरातील राहिलेली विविध विकास कामे लवकरात लवकर पूर्णत्वास येतील, असे आश्वासन चंद्रकांत रघुवंशी यांनी परिसरातील नागरीकांना दिले. यावेळी सुमारे पन्नास कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यात माजी नगरसेवक ज्ञानेश्वर गुमाणे, घुली, रकसवाडा ग्रा.पं.सदस्य राकेश तमायचेकर, डॉ.प्रितेश गुमाणे, भरत इंद्रेकर आदींचा समावेश आहे.
दि.३१ ऑगस्ट रोजी कंजरभाट समाज मुक्ती औचित्य साधून येथील कंजरवाडा परिसरातील प्रभाग ८ मध्ये रायलाल नगर प्रवेशद्वाराचे उद्घाटन शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी व शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. विक्रांत मोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी उपस्थित उपनगराध्यक्ष परवेजभाई करामत खान, पाणी पुरवठा सभापती कैलास पाटील, युनासेना जिल्हाधिकारी अर्जुन मराठे, महिला युवती सेनाजिल्हाध्यक्ष मालती वाळवी, काजल मछले ,नगरसेवक कुणाल वसावे, आरोग्य सभापती फारुख मेमन, नगरसेविका सोनिया राजपूत, माजी नगरसेवक गजेंद्र शिंपी, प्रविण गुरव, माजी नगरसेवक दिलीप बडगुजर, भिम आर्मीचे जिल्हाध्यक्ष संजु रगडे, प्रकाश मच्छले, मंगल चायना घमंडे, राजु घासीकर, नरेश पवार, बंटी नेतलेकर, बलदेव बजरंगे, शेखर घमंडे, मोहन घासीकर तसेच परिसरातील नागरीक मोठ्या परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन माजी नगरसेवक मनोज चव्हाण यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मयुर मच्छले, विशाल मच्छले, कल्पेश तमायचेकर, डॉ.राज तमायचेकर, सुशिल नेतले, प्रकाश घमंडे आदींनी परिश्रम घेतले.