नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा येथून जाणाऱ्या लोणखेडा दोंडाईचा बायपास रस्त्यावर पोलीस ठाण्यासमोरील चौफुलीवर दि.27 ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास दोन ट्रकांमध्ये समोरासमोर भीषण अपघात झाला.यात एका ट्रकची बॉडी चक्काचूर झाली.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहादा येथून जाणाऱ्या लोणखेडा – दोंडाईचा बायपास रस्त्यावर पोलिस ठाण्यासमोरील चौफुलीवर शुक्रवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास दोन ट्रकांमध्ये समोरासमोर भीषण अपघात झाला . यात एका ट्रकची बॉडी चक्काचूर झाली . ट्रक ( क्रमांक जीजे- १२ , एडब्लू -०५६५ ) गुजरात राज्यातून पीव्हीसी पाइपच्या कच्चा माल भरून येत होता . त्याचदरम्यान लोणखेडा कडून येणाऱ्या रिकामा ट्रक ( एमएच -४१ , जी -५३८६ ) वळण घेत असताना हा अपघात झाला . यात एका ट्रकची बॉडी चक्काचूर झाली . कोळदा खेतिया रस्त्यावर अनेक अपघात होत आहे . दिशादर्शक फलक नसल्याने मोठ्या प्रमाणावर अपघात घडत असल्याचे चालक सांगतात .