नंदुरबार ! प्रतिनिधी
शहरातील प्रभाग क्रमांक 17 या परिसरात राहणारे अक्षय जोशी यांचे आकस्मिक निधन झाले होते. घरातील कर्ता पुरुष गेल्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. यामुळे शासनाच्या संजय गांधी विधवा निराधार अर्थसहाय्य योजनेतून मयत अक्षय जोशी यांच्या पत्नीला वीस हजार रुपयांचा आर्थिक मदतीचा धनादेश मिळवून देण्यात आला आहे. यासाठी प्रभागातील नगरसेवक प्रशांत चौधरी व नगरसेविका संगीता सोनवणे यांनी प्रयत्न केले होते.
नंदुरबार शहरातील प्रभाग क्रमांक 17 मध्ये अक्षय जोशी हे आपल्या कुटुंबियांबरोबर रहात होते. परंतु नियतीला मान्य नाही की काय? अक्षय जोशी यांचे आकस्मिक निधन झाले होते. यामुळे जोशी कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला घरातील कर्ता पुरुष गेल्याने त्यांची पत्नीचे पतीत्व तर बालिकेचे पितृछत्र हरपले. अकस्मात निधन झालेल्या व्यक्तींच्या पत्नीला शासनाच्या संजय गांधी विधवा निराधार अर्थसहाय्य आर्थिक मदत दिली जात असते. मयत जोशी यांच्या कुटुंबीयांना अर्थसहाय्य योजनेचा लाभ मिळावा यासाठी नंदुरबार तहसील कार्यालयात प्रस्ताव सादर करण्यात आला होता. हा प्रस्ताव मंजूर होवुन सदर कुटुंबास मदत मिळवुन देण्यासाठी प्रभागातील नगरसेवक प्रशांत चौधरी व नगरसेविका संगीता सोनवणे यांनी पाठपुरावा करून प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नाला यश आल्याने जोशी कुटुंबीयांना आर्थिक मदत मंजूर झाली. या मदतीचा धनादेश नंदुरबार तहसील कार्यालयात मयत अक्षय जोशी यांच्या पत्नी शितल अक्षय जोशी यांना नगरसेवक प्रशांत चौधरी, नगरसेविका संगीता सोनवणे, योगिता बडगुजर, मनीष चौधरी यांनी सुपूर्द करण्यात आला आहे.