Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव त्वरीत सादर करावे

team by team
October 1, 2022
in राज्य
0
जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव त्वरीत सादर करावे
नंदुरबार  l
नंदुरबार जिल्ह्यातील सन 2022-2023 शैक्षणिक वर्षांत 12 वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असून त्यासाठी विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव त्वरीत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीस सादर करावे, असे प्रतिपादन जिल्हा जात पडताळणी समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी अर्जुन चिखले यांनी केले.
राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा विशेष मोहिम निमित्त ज.ग.नटावदकर कनिष्ठ महाविद्यालय,नंदुरबार येथे झालेल्या कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमास समाज कल्याण विभागाचे उपायुक्त राकेश पाटील, पोलीस उपअधिक्षक (दक्षता पथक ) संजय सांगळे, प्राचार्या सौ.सुहासिनी नटावदकर, प्रा.एस.के.चौधरी, प्रा.डी.आर.तांबोळी, प्रा.पी.डी.पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी श्री.चिखले म्हणाले की, जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी समितीस पुरेसा अवधी मिळावा यासाठी बारावी विज्ञान शाखेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी पडताळणी समितीकडे अर्ज सादर करावे. विद्यार्थ्यांना जातपडताळणीसाठी आता कार्यालयात येण्याची गरज नसून यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करुन कागदपत्राच्या पूर्ततेनंतर जातप्रमाणपत्र घरपोच टपालाद्वारे मिळते यासाठी महाविद्यालयातील प्राचार्यांनी व प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे अशा सूचना त्यांनी दिल्यात. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरतांना ईमेल व मोबाईल नंबर तसेच जातीच्या दाखल्यासंबंधी येणाऱ्या अडचणी व इतर तांत्रिक बाबीसंदर्भात मार्गदर्शन केले.
श्री. पाटील यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज कसा भरावा,पडताळणी अर्जासोबत कोणते पुरावे व कागदपत्रे जोडावीत याबाबत सखोल मार्गदर्शन केले. यावेळी मान्यवराच्या हस्ते 12 विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. समितीमार्फत आजपर्यंत 5 हजार 118 ऑनलाईन जात वैधता प्रमाणपत्र वितरीत करण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.गिरीश पवार तर आभार प्रदर्शन प्रा.वर्षा घासकडबी यांनी केले.
सेवा पंधरवडानिमित्त दादासाहेब माणिकराव गावीत,सार्वजनिक कनिष्ठ महाविद्यालय, विसरवाडी व शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय,नवापूर येथे नुकतेच शिबीर संपन्न झाले. या शिबीरात जात प्रमाणपत्र पडताळणीबाबत इयत्ता 11 व 12 वीच्या विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणीबाबत मार्गदर्शन करण्यात येवून विद्यार्थ्यांच्या जात पडताळणीचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्यात.
बातमी शेअर करा
Previous Post

वेळीच माती परीक्षण करून आवश्यक तेवढेच खत जमिनीस देऊन उत्पन्न वाढविणे शक्य : दीपक पाटील

Next Post

अन्न व औषध प्रशासनाने केली जिल्ह्यातील विविध आस्थापनाची तपासणी

Next Post
अन्न व औषध प्रशासनाने केली जिल्ह्यातील विविध आस्थापनाची तपासणी

अन्न व औषध प्रशासनाने केली जिल्ह्यातील विविध आस्थापनाची तपासणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add