नंदुरबार l

तालुक्यतालील समशेरपूर येथील आयान मल्टीट्रेड साखर कारखान्यातर्फे कारखाना कार्यक्षेत्रामध्ये ऊस विकास संवर्धन विषयी ऊस तज्ञांमार्फत गावोगावी मार्गदर्शन करण्यात येत असुन यांस शेतकर्यांचा उत्सुर्त प्रतिसाद मिळत आहे. दि.२६ सप्टेंबर रोजी तळोदा येथे आमलाड व तळोदा कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांचा शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या साठी मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमास कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर बी.टापरे, मुख्य शेतकी अधिकारी ए.आर.पाटील व ऊस विकास अधिकारी व्ही.एस.माळी यांनी मार्गदर्शन केले.
पद्माकर बी.टापरे आपल्या भाषणात म्हणाले की, आपला कारखाना नंदुरबार जिल्ह्यात ऊस गाळपात व ऊस दर वेळेत देण्यात नेहमी अग्रेसर आहे. कारखाना कार्यक्षेत्रात १० ते ११ वर्षापासून ऊस विकास संवर्धन विकासापासून वंचित होता. कारखान्याची रिकव्हरी वाढविण्यासाठी चांगल्या प्रतिचा व चांगल्या रिकव्हरीचा ऊस उत्पादकांनी लावला पाहिजे. कारखान्याची प्रति दिन क्षमता १० हजार मे. टन असून गाळपासाठी लागणारा ऊस याकरिता कारखान्याने बैलगाडी ५००, ट्रॅक्टर टायर ५२५, ट्रक टोळी ४५० व ऊस तोडणी यंत्र ८ इ. उस तोडणी व वाहतुक यंत्रणा भरलेली आहे. प्रति दिवस १२ ते १३ हजार मे. टन ऊस गाळपास येणार आहे. हंगाम २०२२-२३ चालु करण्याची तयारी पुर्ण झाली असुन ऑक्टोबरच्या दसर्या पंधरवडा दरम्यान सुरू होणार आहे.
या वषी १५ लाख मे.टन गाळपाचे उदिष्ट आहे. कारखान्याने आधुनिक तंत्रज्ञानात एक पाउल पुढे टाकत उस उत्पादकांच्या सोयीसाठी कायांचे बांधावर तंत्रज्ञान पोहचवण्याच्या ई-स्मार्ट शुगर उस,तोडणी,वाहतुक व उस वजन व्यवस्थापन या अत्याधुनिक स्वयंचलित प्रणाली चालु केली यामुळे शेतकर्यांना घर आपल्या संपर्ण उसाची माहिती मिळत असल्यामुळे शेकर्यांकडुन या प्रणालीचे कौतुक कारखान्याची रिकव्हरी, ऊस उत्पादन, निरनिराळया ऊसाची जाती वाढविण्यासाठी व्ही.एस.माळी (ऊस विकास अधिकारी) यांची नियुक्ती केली आहे.
कार्यक्षेत्रामध्ये गावोगावी जमिनीपासून ते तोडणी पर्यंतचे ऊसाविषयी माहिती कार्यशाळाद्वारे दिली जाणार आहे. याचा लाभ सर्व ऊस उत्पादकांनी घ्यावा. भविष्यात कारखाना ऊस उत्पादकासाठी बेणे, माती परिक्षण व इतर गोष्टी अमंलात आणण्याचा मानस आहे. ऊस विकास संवर्धन विषयी व्ही.एस.माळी साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना तापी खोर्यातील ऊस उत्पादक १० ते १५ वर्षांपासून चांगल्या रिकव्हरीचा ऊस तयार करण्यात वंचित राहिला आहे. प्रति एकरी कमी खर्च करून उत्पादन वाढणेसाठी ऊस उत्पादकांनी तत्पर राहिले पाहिजे. याकरिता शेतकर्यांनी माती परिक्षण, माती परिक्षणानूसार खताची मात्रा, जमिनीची पूर्व मशागत, शुध्द ऊस बेणे, रासायनिक खताची मात्रा,बेणे प्रक्रिया,ऊसाची मोठी बांधणी, पाण्याचे नियोजन, ऊसांवर फवारणी, तणनाशकाचा वापर तसेच सेंद्रिय खत हे जमिनीसाठी अतिशय उपयोगी असल्याने कारखान्याचे प्रेसमड प्रति एकरी ९ ते १० मे. टन व कारखान्याची राख १ ते १.५ मे. टन पूर्व मशागतीच्या वेळेला टाकणे गरजेचे आहे. ऊस पिकासाठी वरील तांत्रिक पध्दतीने ऊस शेती केली तर कमी खर्च करून एकरी १०० मे. टनाकडे आपण जाऊ शकतो.
यासाठी उस न जाळता तोडणी करणे, कारखान्याचे प्रोग्राम प्रमाणे उस तोडणी करणे इ. नियम आमलात आणावे लागतील तसेच खोडवा पिक हे बोनस पिक आहे. चांगल्या पध्दतीने खोडवा पिक ठेवण्यासाठी पाचट कुटी करून खोडवा पिकाचे उत्पन्न चांगले घेता येते.
कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी ए.आर.पाटील यांनी ऊस तोडणी विषयी माहिती देतांना या वर्षी नोंद केलेल्या संपुर्ण उस गाळपाचे नियोजन केले आहे. गटवार, गाववार व विभागवार ऊस तोडणी यंत्रणेचे चांगल्या प्रकारे नियोजन केले असुन त्यासाठीची संपर्ण तयारी झाली असल्याचे सांगितले.
सदर कार्यक्रमास आमलाड व तळोदा या विभागातील प्रगतशील शेतकरी निसार दादा, राजाभाई गोविंदभाई वाणी, कांतिलाल वामन सुर्यवंशी, गुलाबराव रामाजी मराठे, .गोपाळ पुरुषोत्तम पाटील, नितिन सखाराम पाटील, राजाराम मुरार पाटील, विष्णुपंत मुरार माळी व कारखान्याचे राजेंट रणछोड पाटील, जनार्दन विठ्ठल पटेल (गट प्रमुख) तसेच दित्या पावरा मनोज बाविस्कर, मनोज पाटील (गट सहाय्यक) व मोठया संख्येने ऊस उत्पादक उपस्थित होते.









