Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पोलीस दलातर्फे बैलगाडीवरून लाडक्या गणरायाची मिरवणूक

team by team
September 12, 2022
in क्राईम
0
पोलीस दलातर्फे बैलगाडीवरून लाडक्या गणरायाची मिरवणूक

नंदुरबार l प्रतिनिधी

सण- उत्सव म्हटला म्हणजे पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर बंदोबस्ताची मोठी जबाबदारी असते.
त्यानंतर नंदूरबार येथे पोलिसांनी अनंत चतुर्दशी झाल्यानंतर काल नंदुरबार येथील शहर पोलीस ठाणे, उपनगर पोलीस ठाणे आणि वाहतूक पोलीस शाखेतील ‘श्रीं’ची संयुक्त विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सजविलेल्या बैलगाडीवरून लाडक्या गणरायाची मिरवणूक काढण्यात आली. ढोल ताशांचा गजरात गणपती बाप्पा मोरया असा जयघोष करीत पोलीस अधीक्षकांसह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लेझीम नृत्यावर ठेका धरला. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये श्रींच्या विसर्जन मिरवणूकीचा उत्साह दिसून आला.

दहा दिवसांचा गणेशोत्सव व श्रींची विसर्जन मिरवणूक यशस्वीरित्या पार पाडण्यास खऱ्या अर्थाने परिश्रम घेणाऱ्या पोलिस दलाने नंदुरबार येथील शहर पोलीस ठाणे, उपनगर पोलीस ठाणे व वाहतूक शाखेत लाडक्या गणरायाची स्थापना करण्यात आली. अनंत चतुर्दशीला श्रींची विसर्जन मिरवणूक पार पाडण्यासाठी ठीक ठिकाणी बंदोबस्त ठेवणे ही महत्त्वाची जबाबदारी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांवर असल्याने अनंत चतुर्दशीच्या सकाळपासून ते दुसऱ्या दिवशी सलग सकाळी दहा वाजेपर्यंत पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला.

अखेरच्या टप्प्यातील श्रींचे विसर्जन शांततेत पार पडल्यानंतर सलग दहा दिवस खडा पहारा देणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्यात स्थापन केलेल्या लाडक्या गणरायाची काल रविवारी विसर्जन केले. नंदुरबार शहर पोलीस ठाणे, नंदुरबार उपनगर पोलीस ठाणे व नंदुरबार शहर वाहतूक शाखेच्या वतीने श्रींची मूर्ती सजविलेल्या बैलगाडीवर ठेवून विसर्जन मिरवणूक करण्यात आली.

यावेळी ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थिनींनी लेझीम नृत्य सादर केले. यावेळी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करीत पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी ढोल ताशांवर लेझीम नृत्याच्या ठेका धरला. ही विसर्जन मिरवणूक नेहरू चौकात आल्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, नंदुरबार स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, शहर पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील नंदवाळकर, उपनगरचे पोलीस निरीक्षक दिनेश भदाने यांच्यासह पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांनी लेझीम नृत्य करीत सहभाग नोंदविला.

बातमी शेअर करा
Previous Post

अप्पर जिल्हाधिकारी सोनवणे जळीतकांड आरोपींना जन्मठेप

Next Post

ऋषिकेश येथे महाराष्ट्रातील यात्रेकरूंच्या वाहनाला अपघात; चौघांचा मृत्यू

Next Post
ऋषिकेश येथे महाराष्ट्रातील यात्रेकरूंच्या वाहनाला अपघात; चौघांचा मृत्यू

ऋषिकेश येथे महाराष्ट्रातील यात्रेकरूंच्या वाहनाला अपघात; चौघांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add