Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

गणपती विसर्जन रथाच्या मिरवणूकीला मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झाली सुरूवात

team by team
September 9, 2022
in राजकीय
0
गणपती विसर्जन रथाच्या मिरवणूकीला मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झाली सुरूवात

नाशिक   l

शहरातील भद्रकाली येथील वाकडी बारव येथून गणपती विसर्जन रथ मिरवणूकीची  ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण व क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत आज ढोल, ताशांच्या निनादात उत्साहात सुरूवात झाली. मिरवणूकीत अग्रस्थानी नाशिक महानगरपालिकेचा शासकीय मानाच्या गणपतीसह शहरातील 23 गणपती मंडळांनी सहभाग नोंदविला.

यावेळी आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले, पोलीस महानिरिक्षक बी.जी.शेखर पाटील ,नाशिक शहर पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी आवेश पलोड, कार्यकारी अभियंता संदेश शिंदे यांच्यास‍ह शहरातीत विसर्जन मिरवणूकीसाठी सहभागी गणेश मंडळाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सार्वजनिक उत्सवात दाखल गुन्हे शासनाने घेतले मागे

यावेळी मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, गणेशोत्सव व दहिहंडी सारख्या उत्सवांमध्ये दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे महाराष्ट्र शासनाने मागे घेतले आहेत. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे गणपती उत्सव साजरा करता आला नाही त्यामुळे गेल्या दहा दिवसांपासून नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रात आपण सर्वजण गणेशोत्सव मोठ्या जोषात व उत्साहात साजरा करीत आहोत. सायंकाळी पावसाच्या अंदाजाने मिरवणूक लवकरात लवकर पुढे नेऊन निर्विघ्नपणे पार पाडावी, असे आवाहन यावेळी मंत्री गिरिश महाजन यांनी गणेश मंडळांना केले.

स्वत: ढोल वाजवत केला प्रारंभ

सुरवातीला महापालिकेच्या शासकीय मानाच्या गणपतीची विधिवत पूजा करून आरती करण्यात आली. त्यानंतर थेट मिरवणूकीत सहभागी होवून मंत्री गिरीश महाजन यांनी स्वत: ढोल वाजवून मिरवणूकीस प्रारंभ केला. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया’ असा

गजर करून विसर्जन मिरवणूकीत सहभागी झालेल्या गणेश मंडळाच्या रथांना मंत्री गिरीश महाजन यांनी शुभेच्छा दिल्या. त्यासोबतच मिरवणूक कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून शांततेत पार पाडण्याचे आवाहनही मंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थितांना केले.

बातमी शेअर करा
Previous Post

सातपुड्याच्या कुशीत निसर्गाचं समृद्ध वरदान, विद्यार्थ्यानी दाखवले रानभाज्या उत्सवात

Next Post

अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी वाढीव दराने ३,५०१ कोटी रुपयांची मदत

Next Post
अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी वाढीव दराने ३,५०१ कोटी रुपयांची मदत

अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी वाढीव दराने ३,५०१ कोटी रुपयांची मदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add