Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सातपुड्याच्या कुशीत निसर्गाचं समृद्ध वरदान, विद्यार्थ्यानी दाखवले रानभाज्या उत्सवात

team by team
September 9, 2022
in राज्य
0
सातपुड्याच्या कुशीत निसर्गाचं समृद्ध वरदान, विद्यार्थ्यानी दाखवले रानभाज्या उत्सवात

नंदूरबार l प्रतिनिधी

 

सातपुड्याचा डोंगराळ भाग म्हणजे निसर्गाचं समृद्ध वरदान. निसर्ग पूजक आदिवासी समाजाने हा सांस्कृतिक समृद्ध वारसा जतन करून ठेवण्याचा प्रयत्न केला. अनेक प्रकारची औषधी वनस्पती, दुर्मिळ रानभाज्या या सातपुड्याच्या कुशीत सापडतात.अशाच डोंगरात सापडणाऱ्या भाज्यांचं महोत्सव म्हणजे सातपड्याचे रानभाजी महोत्सवाचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, काल्लेखेतपाडा (उमराणी बु) ता. धडगाव येथे करण्यात आले होते.

या रानभाजी महोत्सवात अनेक रानभाज्याचं दुकाने विद्यार्थ्यांनी मांडली होती. सातपड्याच्या दुर्गम कुशीत या भाज्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून त्याचे आस्वाद घेण्याची व त्या रानभाज्यांना पाहण्याची संधी सगळ्यांना उपलब्ध व्हावी म्हणून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, काल्लेखेतपाडा (उमराणी बु) येथे उमराणी गावच्या प्रथम नागरिक सरपंच आशाताई वंतीलाल पावरा , पंचायत समिती सदस्या शोभीबाई फत्तेसिंग पावरा , जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते फत्तेसिंग पावरा यांच्या उपस्थितीत व धडगाव तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी राजेंद्र बच्छाव व त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या शुभहस्ते या रानभाजी महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे रानभाज्या घरी प्रत्यक्ष तयार करून आणले होते, तर काही भाज्या महोत्सवात प्रत्यक्ष मांडण्यासाठी आणले होते. सदर महोत्सवात पोवाड्या, मुखा, पांढऱ्या, अंबाडी , माटलु, उहल्या, ओह्या (बांबूची भाजी) , हेगलो पाला, बंजान भांजी, कुरटुला , आमली भाजी, कुल, खाटली जंगली भेंडी, वादळी, काकडी, कांदे, लसूण, मिरची, वांगे , काकडी, गीलके, कारले अशा अनेक भाज्या महोत्सवात मांडल्या गेल्या.

या महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरले ते पोवाड्या, बांबूची भाजी व खेकड्याची भाजी मुलांनी स्वतः किंवा काही मुले आई वडिलांची मदत घेऊन काही भाज्या या प्रत्यक्षात शिजवून आणल्या होत्या तर काही भाज्या या लोकांना पाहण्यासाठी व विक्रीसाठी आणल्या होत्या.

यावेळी राजबर्डी बिटचे शिक्षणाविस्तराधिकरी डी डी राजपूत, सिसा बिटाचे शिक्षणविस्ताराधिकारी शिलवंत वाकोडे व सहपरिवार यांची प्रमुख उपस्थिती होती. या महोत्सवासाठी ग्राम पंचायत सदस्य ब्रिजलाल पावरा, राधिका पावरा याही उपस्थित होते. तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पंडित पावरा, सदस्य बटेसिंग पावरा, चेतन पावरा, संतोष पावरा, कुशाल पावरा, नटवर पावरा, तेरसिंग पावरा, गोट्या पावरा, अनिल पावरा, राजू पावरा, अमर पावरा , दिलीप पावरा , जात्र्या पावरा अंगणवाडी सेविका, आशा ताई, यांची उपस्थिती होती.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेची बाल संसदेची मंत्रिमंडळ, मुख्यध्यापक रुपेशकुमार नागलगावे , तेगा पावरा, दशरथ पावरा , लक्ष्मीपुत्र उप्पीन व ग्रामस्थ यांनी प्रयत्न केले.

बातमी शेअर करा
Previous Post

शेतात रानडुकरांनी धुडगूस, पिकांची केले नुकसान

Next Post

गणपती विसर्जन रथाच्या मिरवणूकीला मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झाली सुरूवात

Next Post
गणपती विसर्जन रथाच्या मिरवणूकीला मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झाली सुरूवात

गणपती विसर्जन रथाच्या मिरवणूकीला मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झाली सुरूवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर  गोदाघाट येथे सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभाचे पूजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर गोदाघाट येथे सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभाचे पूजन

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add