तळोदा l प्रतिनिधी
शहरात शिस्तबद्ध व विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे नियोजन करून विविध स्पर्धात पारितोषिक मिळवून नावलौकिक असलेला श्री.क्षत्रिय माळी नवयुवक गणेश मंडळ आज विसर्जन मिरवणुकी काढण्यात आली.
या मिरवणूकित मंडळातील सर्व मूले ,मूली,महिला,,व पूरूष याचा सहभाग असतो.सर्वासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे नियोजन करून विविध नृत्यप्रकाराचे सादरीकरण,कसरतीचे खेळ,नऊपावली लेझीम, पुणेरी ढोल वाद्य पथक, लहान मुलांचे झांज पथक, लहान मुलांचे झेंडा पथक, लहान मुलींचे लेझीम पथक, मुलींचे ढोल वाजत्री पथक, मुलींचे दंडप्रहार, मल्लखांब वरील कसरती, मल्लखांब वरील मनोरे, रोप मल्लखांब व सिल्क मल्लखांब असे एकूण ११ पथके विसर्जन मिरवणूकित समाविष्ट झाली. आसन तालुक्यासाठी आकर्षण ठरले आहे.
गुलाल विरहित मिरवणूक काढण्यात आली असून सर्व शहराचे लक्ष वेधले होते. ह्या मंडळाची गणेश विसर्जन मिरवणूक दरवर्षी अनंत चतूर्दशीच्या एक दिवस आधीची प्रथा असल्याने कार्यक्रमात शिस्तबद्द असतो.गूलाल विरहीत असल्याने शहरासह तालूक्यातील आबालवृद्ध हजेरी लावतात.