नंदूरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील गाठली गावाजवळील तीव्र वळण रस्त्यात दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात विजय आपसिंग पावरा ( वय २७) व दीपक जाड्या पावरा (वय १९) दोन्ही रा. शेलकुवी ता.धडगाव हे गंभीर जखमी झाले आहे. यातील दीपक पावरा यांचा पाय फ्रॅक्चर झाला आहे.
अति वेगाने आलेल्या समोरून बाईक स्वाराने धडक देऊन घटनास्थळावरून पळ काढला आहे. त्यामुळे दुसरा दुचाकी स्वार कोण होता याबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाही.
अपघातानंतर 108 रुग्णवाहिकेला तत्काळ फोन आल्यावर पायलट कुंदन वळवी व डॉ. राकेश तडवी यांनी घटनास्थळी धाव घेत प्राथमिक उपचार करत. जखमींना पुढील उपचारासाठी जवळचे प्राथमिक आरोग्य केंद्र काकडदा येथे उपचारासाठी दाखल केले. दरम्यान काकडदा येथील डॉ. आगळे, वळवी सिस्टर, शिपाई जया भाई यांनी जखमींवर तत्काळ उपचार सुरू केले होते.