नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील काथर्दे दिगर पती-पत्नीसह मुलाला काठीने मारहाण केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा तालुक्यातील काथर्दे दिगर येथील भुऱ्या गुल्या भील यांना आकाा पिंट्या पिंट्या भील याने तुमचा मुलगा गुरु कुठे आहे असे विचारले. यावर भुऱ्या भील यांनी सांगितले की तो गणपती विजर्सन करायला गेला आहे. असे बोलल्याचे वाईट वाटून भुऱ्या भील यांना आकाश भील याने काठीने मारहाण करुन दुखापत केली.
तसेच भुऱ्या भील यांची पत्नीव आशाबाई व मुलगा अनिल यांनाही काठीने मारहाण केली. तसेच शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली. याबाबत भुऱ्या भील यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात आकाश भील याच्याविरोधात भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहकॉ.रामा वळवी करीत आहेत.









