नंदुरबार l

येथील श्रीमती डी.आर.हायस्कूलचा विद्यार्थी मयुर योगेश गवते याने नुकत्याच झालेल्या नंदुरबार तालुका विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक गटात गणितीय प्रयोगशाळा हे उपकरण मांडले होते. परीक्षणाअंती मयूरच्या गणितीय प्रयोगशाळा या उपकरणास नंदुरबार तालुका विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश चौधरी, गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील, नंदुरबार तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष कपूरचंद पाटील, श्रॉफ विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुषमा शहा आदी मान्यवरांच्या हस्ते मयुर गवतेला गौरविण्यात आले.
मयुर गवते व त्याचे मार्गदर्शक शिक्षक योगेश गवतेच्या यशाबद्दल नंदुरबार एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन ऍड.परीक्षीत मोडक, अध्यक्ष नरेंद्र सराफ, उपाध्यक्ष राहुल पाठक, सचिव प्रशांत पाठक, शाळेचे मुख्याध्यापक नारायण भदाणे, उपमुख्याध्यापक सुभाष चौधरी, पर्यवेक्षक पंकज पाठक, विपुल दिवाण तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.









