तळोदा l प्रतिनिधी
गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत नाचण्याच्या कारणावरून दोन गटात वाद उफाळून झालेल्या हाणामारीत ३ जन जखमी झाले असून त्यापैकी एकावर धारदार शस्त्रांने हल्ला केला आहे. याप्रकरणी तळोदा पोलिस ठाण्यात दंगलीचा गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गौरी विसर्जना निमित्त सोमवारी तळोदा शहरातील दुसऱ्या टप्याचे गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणूका निघाल्या होत्या. दरम्यान शहरातील सोनार गल्लीतील मातोश्री ज्वेलर्स समोर सार्वजनिक जागी रात्री ११ वाजेच्या सुमारास मिरवणुकीत युवक नाचत असताना त्यांच्यात शाब्दिक चकमकी होऊन त्याचे पर्यावरण हाणामारीत झाल्याने दोन गटांची एकमेकांवर दगडफेक झाली.
यात प्रतीक मोहन मगरे, निलेश चव्हाण व एक महिलेस किरकोळ दुखापत झाली आहे. तर योगेश उदल पाटील यांस धारधार शस्त्राने कमरेच्या खाली पार्श्वभागावर हल्ला केल्याने त्यात तो गंभीर जखमी झाला आहे.
तळोदा पोलीस प्रशासनाच्या वतीने फिर्यादी पो.ना अजय ब्रिजलाल कोळी यांचा फिर्यादीवरून भादवी कलम १४३, १४७, १४९, ३२६, ३२४, ३२३ सह कलम महाराष्ट्र पो.अधिनियम २०१२ चे ३७ (१) व (३) चे १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित कुमार बागुल हे करत आहेत.
यावेळी अक्षय दिपक माळी, लकेश मोहन माळी, नितीन वाघ, भैया संजय माळी, प्रतीक मोहन मगरे, निलेश चव्हाण, आशितोष पटेल, गोलू दातिर, चंद्रकांत गुरव, योगेश गुरव, योगेश पाटील, यांच्यासह अन्य ५ ते ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी संभाजी सावंत यांनी रात्रीच घटनास्थळी येऊन धाव घेतली अतिरिक्त सुरक्षा दल या ठिकाणी मागविण्यात आले होते. पोलीस निरीक्षक पंडित सोनवणे यांचा मार्गदर्शनाखाली रात्रीच तीन जणांना ताब्यात घेतले असून अन्य जनांचा शोध पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे.








