बोरद l प्रतिनिधी
शहादा तळोदा मतदार संघाचे आ. राजेश पाडवी यांच्याकडून राजविहीर परिसरात विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत भाजपाचे कार्यकर्ते तसेच अनेक ज्येष्ठ सदस्य उपस्थित होते.
गेल्या अनेक दिवसापासून राजविहिर परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने लोकप्रतिनिधींकडे राजविहीर ते रेवानगर रस्त्यावर असलेल्या नदीवर पुलाचे बांधकाम करणेबाबत मागणी गेल्या काही वर्षपासून सतत करण्यात येत होती. त्याचप्रमाणे राजविहीर ते बेलीपाडा रस्त्यावर असलेल्या नदी पुलाचे बांधकाम करणे बाबतही मागणी अनेक दिवसापासून परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने होत होती.
आ. राजेश पाडवीकडे राजविहीर येथील भाजपाचे जेष्ठ सदस्य सतीश वळवी यांनी वेळोवेळी राजविहीर ते रेवानगर या रस्त्यावर असलेल्या नदीवर पूल बांधकाम करणेबाबत तसेच राजविहीर ते बेलीपाडा रस्त्यावर असलेल्या नदीवर पूल बांधकाम करणेबाबत मागणी लावून धरली होती.
या मागणीचा सकारात्मक विचार करत आ. राजेश पाडवी यांनी आदिवासी विकास विभागाअंतर्गत अर्थसंकल्प २०२२,२३ अंतर्गत राजविहीर ते रेवानगर रस्त्यावर असलेल्या नदीवर पूल बांधकाम करणेबाबत ६५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तसेच राजविहीर ते बेलीपाडा रस्त्यावर पुलाचे बांधकाम करणे कामी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
या कामाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.
त्याचबरोबर लेखशीर्ष २५१५,१२३८ मंजूर असलेल्या राजविहीर येथे गावांतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे कामी १० रुपयांच्या कामाचे तसेच बुधावली येथे रस्ता कॉंक्रिटीकरण करणे कामी १९ लाख रुपयांच्या कामाचे उद्घाटन आज आ. राजेश पाडवी यांच्या वतीने करण्यात आले. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ सदस्य सतीश वळवी तसेच तळोदा पंचायत समितीचे माजी सभापती आकाश वळवी,शानूताई वळवी, राजविहीर ग्रामपंचायत सदस्य शारदा नाईक, प्रकाश पाडवी, तुकाराम वळवी,तुळशीराम पाडवी, कृष्णा पाडवी तसेच राजविहीर व बेलीपाडा गावातील समस्त ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते.
यावेळी रेवनागर,बेलपाडा,रेवनागर ग्रामस्थांच्या वतीने आ.राजेश पाडवी यांचे आभार व्यक्त करण्यात आले.








