शहादा l
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या नंदुरबार जिल्हा संघटक पदी प्रा. डी. सी. पाटील यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.
प्रा. पाटील यांची अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या तालुकाध्यक्ष पदाच्या कारकीर्दीत केलेल्या कामाची दखल घेत पंचायतीच्या राज्य कार्यकारिणीने हा निर्णय घेतला. जिल्हाध्यक्षा श्रीमती वंदना तोरोवणे यांच्या हस्ते प्रा. पाटील यांना जिल्हा संघटकपदी नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
प्रा. पाटील यांनी आतापर्यंत विविध शैक्षणिक व सामाजिक पदांवर काम करीत आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या तालुकाध्यक्ष पदाच्या कारकीर्दीत अग्रक्रमाने ग्राहकांच्या समस्या सोडविण्यावर भर दिला होता. त्यातून ग्राहक चळवळीला चालना मिळाली आहे.








