नंदुरबार l
येथील एल.आय.सी.विमा प्रतिनिधी यांनी आज शाखेचा बाहेर उभे राहून कुठले काम न करता विश्राम दिवस पाळण्यात येऊन आंदोलन केले.
वेस्टर्न झोनल ऑल इंडिया लिआफी सलंग्न ज्वाइट एक्शन कमिटी तर्फे दिनांक 05 सप्टेंबर 2022 रोजी संपूर्ण एल.आय.सी. विमा प्रतिनिधींचा विश्राम दिवस पाळण्यात आला. हे आंदोलन विमा प्रतिनिधीचा विविध मागण्यासाठी करण्यात आल्या. शाखेच्या आवारात प्रतिनिधी मागणी मंजुर करण्या संदर्भात घोषणा दिल्या.
त्यात लिआफी जॉईंट क्शन कमिटी जिंदाबाद, पॉलिसीधारकांना बोनस वाढलाच पाहिजे, कर्जाचे आणि लेट फीचे व्याजदर कमी करा , विमा हप्ता वरील जीएसटी मागे घ्या, विमा प्रतिनिधींच्या वेलफेअर फंड तयार करा, विमा प्रतिनिधींच्या ग्रॅच्युइटीमध्ये वाढ झालीच पाहिजे, विमा प्रतिनिधींना टर्म इन्शुरन्स वाढवून द्या, विमा प्रतिनिधींना न्याय आणि प्रतिष्ठा मिळालीच पाहिजे, सर्व विमा प्रतिनिधींना मेडिक्लेम मिळालाच पाहिजे, विमा प्रतिनिधींना पेन्शन मिळालीच पाहिजे,
विमा प्रतिनिधींना भविष्य निर्वाह निधी लागू करा, सघंटनेच्या प्रमुख मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी लिआफी संघटनेचे एल.आय.सी. नंदुरबार शाखेचे अध्यक्ष अनिल सतंवाणी, मोहन खानवाणी, बापू मराठे, जितेंद्र माळी, धनराज मराठे, महेंद्र जोशी, अजित जैन, मनोज जयस्वाल , दुर्गेश राठोड, फिरोज खान, सौ. सुजाता पवार, सौ.शिंदे, सौ.गंवादे, सौ. बोरसे आदी विमा प्रतिनिधी उपस्थित होते.








