Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

गणेशोत्सव साजरा करतांना नियमांचे पालन करावे : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

team by team
August 26, 2022
in राज्य
0
गणेशोत्सव साजरा करतांना नियमांचे पालन करावे : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

नंदुरबार l प्रतिनिधी

 

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे उत्सव साजरे करण्यावर निर्बंध होते. यंदा शासनाने निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला असल्याने सर्व गणेश मंडळांनी गणेशोत्सव साजरा करतांना नियमांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी शांतता कमिटीच्या बैठकीत केले.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस आमदार राजेश पाडवी, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उप विभागीय अधिकारी चेतन गिरासे, पोलीस उप अधीक्षक सचिन हिरे, तहसिलदार मिलींद कुळकर्णी, मंदार कुळकर्णी, भाऊसाहेब थोरात यांच्यासह गणेश मंडळाचे पदाधिकारी, शांतता कमिटीचे सदस्य उपस्थित होते.

 

श्रीमती खत्री म्हणाल्या की, यंदाचा गणेशोत्सव साजरा करतांना मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी नियमांचे पालन करुन उत्सव साजरा करावा. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी रक्तदानासारखे आरोग्य विषयक उपक्रम, आरोग्य शिबीरे आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे. वीज वितरण कंपनीने उत्सवकाळात अंखड वीज पुरवठा सुरु राहील याची दक्षता घ्यावी. मिरवणुक दरम्यानचे रस्त्यावर खड्डे पडले असतील त्याठिकाणी भराव करुन दुरुस्तीची कामे करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

 

आमदार पाडवी म्हणाले की, गणेश मंडळ आयोजकांनी सण उत्सव साजरा करतांना नियमांचे पालन करावे, गणेश मंडळ स्वंयसेवकांनी नियमांचे पालन करुन गणेशोत्सवाच्या मिरवणूका काढाव्यात, मिरवणूका काढतांना वेळेच्या बंधनाचे पालन करावे. मिरवणुकीत अडथळा येणाऱ्या वायर, केबल बाजुला करण्यात येवून यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 

श्री. पाटील म्हणाले, सर्व मंडळांना विविध स्वरुपाच्या परवानगीसाठी पोलीस विभागाकडून एक खिडकी योजना जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यात उपलब्ध करुन दिली असून मंडळांनी नियमानुसार परवानगी प्राप्त करुन घ्यावी. गणेशोत्सवामधील नागरिकांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी गणेशोत्सव काळात हेल्पलाईन सुरु करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. शासनाच्या मार्गदशक सुचनांचे पालन करुन शांततामय वातावरणात उत्सव साजरा होण्यासाठी नागरिकांनीही प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

बातमी शेअर करा
Previous Post

लाभार्थ्यांनी घरकुलाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे प्रकल्प संचालकाचे आवाहन

Next Post

२२ व्या नंदुरबार जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेत नंदुरबारच्या संघाला सर्वसाधारण विजेतेपद

Next Post
२२ व्या नंदुरबार जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेत नंदुरबारच्या संघाला सर्वसाधारण विजेतेपद

२२ व्या नंदुरबार जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेत नंदुरबारच्या संघाला सर्वसाधारण विजेतेपद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add