नंदुरबार l प्रतिनिधी

शहरालगत असलेल्या उमर्दे रस्त्यावरील तुलसी नगरातून चोरट्याने तीन चाकी रिक्षा चोरुन नेल्याची घटना घडली.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार शहरालगत उमर्दे रस्त्यावरील तुलसी नगरात राहणारे राजेंद्र तुमडु मराठे यांच्या मालकीची २० हजार रुपये किंमतीची तीन चाकी रिक्षा (क्र.एम.एच.३९- ७४८३) चोरट्याने चोरुन नेली.
याबाबत राजेंद्र मराठे यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.मंगलसिंग कोकणी करीत आहेत.









