नंदूरबार l प्रतिनिधी

एस.ए.मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे राष्ट्रीय युवक दिना निमित्त फेस पेंटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .

75 व्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा एडस् प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा रुग्णालय नंदुरबार यांच्याकडून दि. 12 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट दरम्यान युवक व युवतींमध्ये एचआयव्ही/एडस् विषयी जनजागृती व्हावी यासाठी जिल्ह्यात विविध कार्यक्रम राबविले जात आहेत.
या कार्यक्रमाअंतर्गत युवा दिनानिमित्त एस.ए.मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे फेस पेंटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या मध्ये कनिष्ठ महाविद्यालयीन युवक व युवतींनी उत्स्फूर्त सहभाग घेत चेहऱ्यावर आकर्षक तिरंगा आणि एच.आय.व्ही एड्स रोगाचे लोगो पेंटिंग करत शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत केले.
या वेळी महाविद्यालयातील प्रा.चंद्रकांत निकम,प्रशांत पाटील,हितेश पाटील,हेमंत पाटील,स्वप्नील अहिरे,रत्नदीप साळवे यांनी परिश्रम घेतले,तर शाळेच्या प्राचार्य नूतनवर्षा वळवी,उपमुख्याध्यापक विजय पवार,ज्यू,कॉलेज चे पर्यवेक्षक सी.पी.बोरसे आदींनी कौतुक केले.









