Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्हा पोलीस क्रिडा स्पर्धेचे उद्घाटन अंमलदाराच्या हस्ते

team by team
August 24, 2022
in राज्य
0
जिल्हा पोलीस क्रिडा स्पर्धेचे उद्घाटन अंमलदाराच्या हस्ते

नंदूरबार l प्रतिनिधी

नंदुरबार जिल्हा पोलीस क्रिडा स्पर्धेचे मंगळवारी पोलीस ग्राऊंडवर उद्घाटन झाले. पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांचे हस्ते उद्घाटन होणार होते परंतु IPS अधिकाऱ्याने पोलीस अंमलदार ईश्वर गावीत यांना उद्घाटनाचा मान देऊन पोलीस कर्मचाऱ्यांबद्दलची आपली बांधिलकी जपली आहे. ASI गावीत हे याच महिन्याच्या अखेरीस सेवानिवृत्त होत आहेत. या जिल्हा पोलीस क्रिडा स्पर्धांचा समारोप गुरुवार दि.२५ रोजी जिल्हाधिकारी श्रीमती मनिषा खत्री यांचे हस्ते होणार आहे.

 


दि. 22 ते 24 ऑगस्ट रोजी दरम्यान पोलीस मुख्यालय , नंदुरबार येथील कवायत मैदानावर खेळल्या जाणाऱ्या 22 वी नंदुरबार जिल्हा पोलीस क्रिडा स्पर्धेचे उद्घाटन नंदुरबार जिल्हा पोलीस दलातून ऑगस्ट महिना अखेरीस सेवानिवृत्त होणारे पोलीस मुख्यालय नंदुरबार येथील मुख्य क्रिडा प्रशिक्षक सहा . पोलीस उप निरीक्षक ईश्वर सोमा गावीत यांचे हस्ते ज्योत प्रज्वलन करुन करण्यात आले .

 

यावेळी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील , अपर पोलीस अधीक्षक विजय पवार , पोलीस उप अधीक्षक ( मुख्यालय ) विश्वास वळवी , आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उप अधीक्षक आत्माराम प्रधान , नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे , शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे ,

 

अक्कलकुवा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संभाजी सावंत यांचेसह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व पोलीस खेळाडु उपस्थित होते . नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी जिल्हा स्तरीय क्रिडा स्पर्धेचे उद्घाटन पोलीस दलातील कनिष्ठ स्तरावरील सहा . पोलीस उप निरीक्षक ईश्वर सोमा गावीत यांना संधी देवून पोलीस अमंलदाराच्याप्रती असलेली आपुलकी दाखविली .

 

जनतेची सुरक्षा हे पोलीसांचे कर्तव्य असून त्यासाठी पोलीस दिवसरात्र मेहनत करून आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत असतात . परंतु रात्रगस्त , गुन्ह्याचे तपासकामी बाहेर गावी , बंदोबस्त , कायदा व सुव्यवस्था बंदोबस्त इत्यादी अनेक कारणांमुळे पोलीसांचे वैयक्तीक आरोग्याकडे त्यामुळे त्यांना विविध प्रकारच्या व्याधी होवून शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते .

 

पोलीसांनी जनतेच्या सुरक्षेचे व्रत घेतलेले असून त्यासाठी ते अहोरात्र झटत असतात . जनतेच्या सुरक्षेसोबतच स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे , त्यासाठी मैदानी खेळ खेळून आपली शरीरयष्टी उत्तम ठेवणे गरजेचे असते . त्याचप्रमाणे मैदानी खेळ खेळल्यामुळे आपली शारीरिक स्थिती उत्तम राहाते व मानसिक ताण तणाव देखील दुर होतो .

 

नियमित मैदानी खेळ खेळल्यामुळे स्वास्थ्यावर सकारात्मक प्रभाव पडतो . तसेच पोलीसांना त्यांचे कर्तव्य पार पाडत असतांना बंदोबस्त करण्यासाठी तसेच आरोपींना पकडण्यासाठी शारीरिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक असते , म्हणून पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी आपल्या दैनंदिन कामकाजातून मैदानी खेळांसाठी थोडा वेळ काढुन मैदानी खेळ खेळावे .

 

तसेच नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने परिक्षेत्रीय , राज्य स्तरीय तसेच राष्ट्रीय स्तरावर केलेल्या गौरवशाली कामगिरीचा इतिहास सर्वांना सांगितला . तसेच खेळामुळे सांघिक काम करण्याची वृत्तीत वाढ होते असे सांगून नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी उद्घाटन प्रसंगी सर्वांना मार्गदर्शन केले . दरम्यान पोलीस मुख्यालय , नंदुरबार येथील कवायत मैदानावर खेळल्या जाणाऱ्या 22 वी नंदुरबार जिल्हा पोलीस क्रिडा स्पर्धेमध्ये पोलीस मुख्यालय , नंदुरबार , नंदुरबार विभाग , शहादा विभाग , अक्कलकुवा विभाग असे एकुण 4 संघ हे सांघिक व वैयक्तिक खेळ ,

यामध्ये स्विमींग , कुस्ती , ज्युडो , बॉक्सींग , वेटलिफ्टींग , 100 , 200 , 400 , 800 मीटर धावणे , फुटबॉल , हॉकी , व्हॉलीबॉल इत्यादी क्रिडा प्रकारांचा समावेश आहे . प्रत्येक संघामध्ये साधारणतः 60 खेळाडु असे एकुण 240 सांघिक व वैयक्तिक खेळाडु सहभाग घेणार आहेत . तसेच खेळाडूंमध्ये खिलाडूवृत्ती राहावी तसेच पोलीस दलाचा नावलौकिक राहावा याकरीता सर्व खेळाडूंनी शपथ घेतली . जिल्हा क्रिडा स्पर्धेमध्ये सांघिक व वैयक्तिक खेळातून प्राविण्य मिळविलेल्या खेळाडूंची नाशिक परिक्षेत्रीय क्रिडा स्पर्धेसाठी निवड करण्यात येत असते .

बातमी शेअर करा
Previous Post

आश्रमशाळांसाठी ६०० कोटींची तरतूद : आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित

Next Post

जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातर्फे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन

Next Post
जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातर्फे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन

जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातर्फे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add