नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील के . आर . पब्लिक स्कुल , ज्यु . कॉलेजमध्ये 75 वा स्वातंत्र दिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
श्री स्वामी समर्थ विद्यानिकेतन संचलित के . आर . पब्लिक स्कुल , ज्यु . कॉलेज येथे ” 75 आजादी का अमृत महोत्सव ” धुमधडाक्यात साजरा करण्यात आला . सर्वप्रथम प्रमुख पाहुण्यांचे स्वागत लेझीमच्या तालावर करण्यात आले . आणि नंतर प्रमुख पाहुणे संस्थेचे चेअरमन किशोरभाई वाणी यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .
तसेच इयत्ता 10 वी आणि 12 वीत बोर्डात प्रथम आलेल्या विद्यार्थ्याचे व त्याच्या पालकांचा स्वागत व पदक देऊन सम्मान करण्यात आला . तदनंतर चेअरमन यांनी आपल्या भाषणातुन स्वातंत्र्य विरांचे बलिदान त्यांनी मिळवुन दिलेल्या स्वातंत्र्याला सांभाळुन ठेवण्याचा संदेश दिला . शाळेचे व्हा . चेअरमन सिध्दार्थ वाणी , सौ . केतकि सिध्दार्थ वाणी , प्राचार्य डॉ . छाया शर्मा यांनी 75 व्या स्वातंत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या . तसेच विविध स्पर्धात्मक परिक्षेत उत्तम स्थान प्राप्त विदयार्थांचे कौतुक केले .








