नंदूरबार l प्रतिनिधी
स्वतंत्र भारताच्या 75 वर्षाच्या उपलक्ष हर घर तिरंगा व अमृत महोत्सव कार्यक्रम अंतर्गत भारतीय सेना स्टेशन कमांडर नासिक तसेच अटलरी सेंटर नाशिक यांच्या आदेशान्वये 7 फिल्ड रेजिमेंटचे कमांडिंग ऑफिसर तसेच 267 साटा बॅटरीचे कमांडिंग ऑफिसर यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक व त्यांच्या परिवारासाठी सीएसडी कॅन्टीन तसेच मेडिकल सुविधा साठी नंदुरबार तहसील कार्यालय येथे कॅम्प लावण्यात आला होता.
नंदुरबार तालुक्याचे तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यासाठी नायब तहसीलदार श्री बोरसे यांनी हॉल उपलब्ध करून दिला. या ठिकाणी सर्व माजी सैनिक, आजी सैनिक, माजी सैनिक विधवा व त्यांच्या परिवाराने यांनी अतिशय उत्तम प्रतिसाद देत सेवेचा लाभ घेतला. सैनिकांना आपल्या जिल्ह्यात कॅन्टींग ची सुविधा मिळाल्यामुळे अतिशय आनंद होत होता.
सर्व सैनिकांनी आलेल्या अधिकाऱ्यांना सांगितले की प्रत्येक महिन्याला कॅन्टींग ची सुविधा मिळावी तसेच मेडिकलची सुविधा सुद्धा मिळावी या ठिकाणी एखाद्या दवाखान्याशी खूपच गरज आहे कारण नंदुरबार जिल्ह्याचे ठिकाण आहे त्यासाठी 100 किलोमीटर धुळे किंवा 250 किलोमीटर नाशिक येथे जावे लागते. यासाठी 1 ते 2 दिवस लागतो यामुळे सैनिकांना खूपच त्रास होतो. अधिकाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत कळवू असे कळविले आहे.

नंदुरबार जिल्हा अतिशय दुर्गम भागात असल्यामुळे त्यांना या सेवेचा लाभ मिळावा व आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवू अशी प्रतिक्रिया साटा बॅटरीचे सुभेदार श्री बिपिन कुमार व 7 फिल्डचे सुभेदार श्री पी बिजू यांनी सांगितले या सुविधेसाठी नाशिक येथून दोन्ही रेजिमेंट ने भारतीय सेनेच्या गाडीमध्ये सामान घेऊन नंदुरबार जिल्ह्यातील माजी सैनिकांना याचा लाभ दिला या सर्व कृतज्ञता साठी सर्व भारतीय सेनेतील अधिकारी व कर्मचारी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील माजी सैनिक संघटक सुभेदार मेजर रामदास पाटील, माजी सैनिक अरविंद निकम, संजय रणवले, नरेंद्र बागुल, भटू माळी व राजेंद्र बागुल व भारतीय सैन्य दलातील सेवारत सैनिक आर.एच.एम. बी.नागराजा, हवालदार विजयकुमार, सुबीन, नायक जसपाल सिंग, एमशंकर,एकांता डे, एम संतोष, एम. के. मिश्रा ,लाॅन्स नायक केशव बेलदार, अश्विन दुबे व दीपक चौधरी आदींनी परिश्रम घेतले. सर्व नंदुरबार जिल्ह्यातील आजी-माजी तसेच विधवा भगिनींनी या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या त्याबद्दल त्यांच्या कमांडिंग अफसर यांना शुभेच्छा दिल्या.








