Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मान गये एसपीसाहेब : काल्लेखेतपाडा येथील ‘सेतू’ चे उद्घाटन, पोलीस दलाच्या वतीने बांधला लोखंडी पूल

team by team
August 14, 2022
in सामाजिक
0
मान गये एसपीसाहेब : काल्लेखेतपाडा येथील ‘सेतू’ चे उद्घाटन, पोलीस दलाच्या वतीने बांधला लोखंडी पूल

नंदूरबार l प्रतिनिधी

आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पूर्व दिनी धडगाव तालुक्यातील उमराणी बु|| गावातील काल्लेखेतपाडा व उमराणी या मुख्य गावाला जोडणाऱ्या पुलाचं म्हणजेच सेतूचं उद्घाटन करण्यात आला.

मागील महिन्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे शाळेत येणाऱ्या व पाड्यावरील ये जा करणाऱ्या लोकांना रस्त्यातील नाल्यामुळे खूप अडचण येत होती. याची बातमी वृत्तपत्र व इतर माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर त्या बातम्यांची दखल घेऊन नंदुरबार पोलीस दलाच्या वतीने नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य गाव उमराणी बु व त्याचा पाडा काल्लेखेतपाडा यांना जोडणाऱ्या पुलाची गरज लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकीच्या नजरेतून एक लोखंडी पूल बांधण्यात आला.

 

याचे उद्घाटन नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं. या पुलाचे पूजन पाड्यावरील वयोवृद्ध व ज्येष्ठ व्यक्ती सरदार पावरा, शामसिंग डेड्या पावरा, गणेश पावरा, लकड्या पावरा, वेलज्या पावरा , वेल्या पावरा , नटवर पावरा, कुशाल पावरा, दारासिंग पावरा, यांच्या शुभहस्ते पूजन करण्यात आले. तसेच या पुलाचे औपचारिक उद्घाटन कुमारी सुवर्णा माका पावरा व कुमार राजनंदन शिलेदार पावरा या शाळेतल्या मुलांच्या शुभहस्ते करण्यात आले.

 

स्वातंत्र्याच्या पूर्व पूर्वसंध्येला पाड्यासाठी मिळालेला हा पूल अनेक पिढ्यांना दिशादर्शक ठरणारा आहे. पाड्यावरील लोकांना व शाळेपर्यंत येणाऱ्या मुलांना ये – जा करण्यासाठी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये खूप मोठी अडचण निर्माण येत होती. ७० ते ८० मुलं या रस्त्यावरून या नाल्यातून दररोज शाळेमध्ये जात असतात. खूप मोठा पाऊस पडल्यानंतर हा नाला पूर्ण भरून काही वेळा अडचण येत होती. याची गरज लक्षात घेऊन लोखंडी पुलाचे बांधकाम नंदुरबार पोलीस दलाच्या वतीने करण्यात आला. पुलाचं बांधकाम करण्यासाठी नंदुरबार पोलीस दल व धडगाव पोलीस दलाचे अनमोल सहकार्य लाभले आहे. धडगाव तालुक्याचे पोलीस निरीक्षक जी. आर. अवताडे साहेब व त्यांची टीम दिवस व रात्र मेहनत करून सदर पूल मुलांना व गावकऱ्यांना उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी आपले मत व्यक्त करताना पोलीस दलाने हे केलेलं काम हे फक्त पोलीस दलाचे नसून इथल्या शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी राजमार्ग असल्याचं मत व्यक्त केलं. अशा कठीण परिस्थितीला तोंड देऊन शिक्षणासाठी येणाऱ्या मुलांना आज नंदुरबार पोलीस दलाच्या वतीने एक अनोखी सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न आम्ही केला. शिक्षणापासून वंचित घटक व गावकऱ्यांना ये जा करण्यासाठीचा हा रस्ता समाज व समाजासाठी झटणाऱ्या लोकांना प्रेरणादायी ठरणारा असावा. यासाठी संपूर्ण ग्रामस्थ, आमची नंदुरबार पोलीस दल यांनी केलेली मेहनत याचं आम्हाला कौतुक वाटतं.

सदर पुलाचे बांधकाम केल्याबद्दल आदिवासी एकता परिषद, धडगाव यांच्या वतीने आदिवासी प्रतीक चिन्ह धनुष्यबाण देऊन संपूर्ण टीमचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील , उपविभागीय पोलिस अधिकारी संभाजी सावंत, पोलिस निरीक्षक जी. आर. औताडे , स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर , पोलिस निरीक्षक धनराज निळे , पोलीस पाटील तानाजी पावरा हे उपस्थित होते . आज या उद्घाटन प्रसंगी गावातील संपूर्ण शाळा व्यवस्थापन सदस्य, पालक, गावातील ज्येष्ठ व्यक्ती , ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते, तरुण मित्रवर्ग पोलीस दलातील अधिकारी, शिक्षक , विद्यार्थी , पोलीस कर्मचारी, आदिवासी एकता परिषदचे कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी या वेळी सांगितले की, पोलीस दलाने हे केलेलं काम हे फक्त पोलीस दलाचे नसून इथल्या शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी राजमार्ग असल्याचं मत व्यक्त केलं. अशा कठीण परिस्थितीला तोंड देऊन शिक्षणासाठी येणाऱ्या मुलांना आज नंदुरबार पोलीस दलाच्या वतीने एक अनोखी सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न आम्ही केला. शिक्षणापासून वंचित घटक व गावकऱ्यांना ये जा करण्यासाठीचा हा रस्ता समाज व समाजासाठी झटणाऱ्या लोकांना प्रेरणादायी ठरणारा असावा. यासाठी संपूर्ण ग्रामस्थ, आमची नंदुरबार पोलीस दल यांनी केलेली मेहनत याचं आम्हाला कौतुक वाटतं.

आमच्या कित्येक पिढ्या या नाल्यातून संघर्ष करून प्रवास केला. आज आम्हाला आनंद होतोय. या पुलामुळे गरोदर स्त्रिया, म्हातारी माणसे, शाळेतली मुलं ही आता अडचणीत येणार नाहीत.

सरदार पावरा, ग्रामस्थ

 

आम्ही ७० ते ८० मुले ही दररोज हा नाला ओलांडून शाळेत येतो. खूप मोठा पडल्यानंतर नाला ओलांडताना खूप अडचण येत होती. पण नंदुरबार पोलीस दलाने लोखंडी पूल देऊन आम्हाला ये जा करण्यासाठी आता अडचण येणार नाही. व पाण्याची भीती पण राहणार नाही. याबद्दल नंदुरबार पोलीस दलाचे मी मनापासून आभार व्यक्त करते.

निर्जला पावरा, विद्यार्थिनी

बातमी शेअर करा
Previous Post

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर, डॉ. विजयकुमार गावित यांना मिळाले आदिवासी विकास विभाग

Next Post

माजी मंत्री अँड. के.सी.पाडवी यांचे वडील चांद्या जुगला पाडवी यांचे निधन, मंगळवार रोजी असली येथे होणार अंतीम संस्कार

Next Post
माजी मंत्री अँड. के.सी.पाडवी यांचे वडील चांद्या जुगला पाडवी यांचे निधन, मंगळवार रोजी असली येथे होणार अंतीम संस्कार

माजी मंत्री अँड. के.सी.पाडवी यांचे वडील चांद्या जुगला पाडवी यांचे निधन, मंगळवार रोजी असली येथे होणार अंतीम संस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add