तळोदा | प्रतिनिधी
तळोदा येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ विद्यार्थी विकास विभाग तथा कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास विभाग आणि सातपुडा ग्रीन व्हॅली यांच्या संयुक्त विद्यमाने बांबू राखी विक्री व प्रदर्शन तसेच बांबू रोप वाटप आणि बांबूंच्या वस्तूंचे प्रदर्शन दि.६ ऑगस्ट रोजी भव्य बांबूंच्या राखी विक्री व प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.
सदर प्रदर्शन हे इको फ्रेंडली रक्षाबंधन साजरी व्हावी या उद्देशाने तसेच प्रत्येक घटकाने एक झाड लावावे याकरिता सातपुडा ग्रीन व्हॅली यांच्यामार्फत मोफत रोप वाटप कार्यक्रम आयोजित केला आहे.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲड.सिमा वळवी, माजी मंत्री.ॲड.पद्माकर वळवी उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचा लाभ सर्वांनी घ्यावा व बांबूंपासून तयार होणार्या सर्व वस्तू या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. बांबू प्रक्रियेपासून बनवलेल्या सर्व वस्तूंंची माहिती तळोदा येथील महाविद्यालयात मिळणार आहे. प्रथमतः अशा प्रदर्शनास गावातील शहरातील नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे. जास्तीत जास्त समाज बांधवांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ.एस.एन.शर्मा आणि विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.महेंद्र माळी, प्रा.जे.एन.शिंदे यांनी केले आहे.








